मुंबई : बिग बाॅसचे सीजन 15 फ्लाॅप गेल्यानंतर यंदाचे बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) चे सीजन खास आणि टीआरपीमध्ये टाॅपला ठेवण्यासाठी बिग बाॅसच्या निर्मात्यांनी सुरूवातीपासूनच कंबर कसली होती. यावेळी बिग बाॅसने विविध क्षेत्रातील लोकांना देखील बिग बाॅसच्या घरात सहभागी होण्यासाठी संधी दिली. अर्चना गाैतम राजकारणी, अब्दु रोजिक विदेशी गायक, एमसी स्टॅन रॅपर, शिव ठाकरे (Shiv Thakare) मराठी बिग बाॅसचा विजेता आणि बाकी जवळपास सर्वजण टीव्ही क्षेत्राशी संबंधित होते. बिग बाॅस 16 चे वादग्रस्त नाव म्हणून अर्चना गाैतम हिच्याकडे बघितले जायचे. एका भांडणामध्ये शिव ठाकरे याचा थेट अर्चना गाैतम हिने गळा पडला होता. यानंतर बिग बाॅसने अर्चना गाैतम हिला तीन दिवसांसाठी बेघर देखील केले होते. मात्र, सलमान खान याच्या आर्शिवादाने परत अर्चना गाैतम ही बिग बाॅसच्या घरात दाखल झाली. प्रियंका चाैधरी ही तिचा मित्र अंकित गुप्ता याच्यासोबत बिग बाॅस 16 मध्ये सहभागी झाली होती. टाॅप थ्रीमध्ये प्रियंका चाैधरी (Priyanka Choudhary) होती. अनेकदा बिग बाॅसच्या घरात काही विषय नसताना देखील प्रियंका भांडताना दिसली.
प्रियंका चाैधरी हिची फॅन फाॅलोइंग मोठी आहे. बिग बाॅस 16 च्या घरात प्रियंका चाैधरी हिचा गेमही चांगला होता. अनेकदा दुसऱ्यांच्या भांडणामध्ये पडल्यामुळे सलमान खान याने तिचा क्लासही लावला.
तिसऱ्या क्रमांकावर प्रियंका चाैधरी ही जरी बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडली असली तरीही तिचे चाहते प्रियंका चाैधरी हिच खरी बिग बाॅस 16 ची विजेती असल्याचे म्हणताना दिसत आहेत.
नुकताच प्रियंका चाैधरी हिचा भाऊ योगेश चाैधरी याने श्रुति शर्मा हिच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवर आता प्रियंका चाैधरी हिचे चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
एका चाहत्याने लिहिले की, योगेश तुझी बहीण प्रियंका चाैधरी हिला थोडे समजावून सांग. तिने एमसी स्टॅन याला इंस्टाग्रामवर फाॅलो केले आहे. तिला एमसी स्टॅन याला अनफाॅलो करायला सांग.
एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यानंतर प्रियंका चाैधरी हिचे चाहते नाराज झाले आहेत. त्यांना वाटते की, प्रियंका चाैधरी हिच खरी बिग बाॅस 16 ची विजेती आहे. प्रियंका चाैधरी हिच्यावर अन्याय झाला आहे.