धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, 35 दिवसांचा तुरुंगवास; Munawar Faruqui ची ही पण एक बाजू

Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui : कॉमेडी शोला लोक गर्दी करत होते. शओ हाऊसफुल व्हायचे पण लोकप्रियतेच्या शिखरावर असताना Munawar Faruqui ला अटक झाली होती... तेव्हा नेमकं काय झालेलं? मुनव्वर फारूकीवर कोणते आरोप झाले? मुनव्वरची दुसरी बाजू... वाचा सविस्तर...

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, 35 दिवसांचा तुरुंगवास; Munawar Faruqui ची ही पण एक बाजू
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 12:07 PM

मुंबई | 29 जानेवारी 2024 : मुनव्वर फारूकी… बिग बॉस 17 चा विजेता… काल रात्री बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडला. या सिझनच्या विजेतेपदाची माळ मुनव्वर फारूकीच्या गळात पडली. त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या प्रवासाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. पण तुम्हाला माहिती आहे. का की भारतातील जनतेने ज्याला भरभरून प्रेम दिलं तो त्या मुनव्वरला एकेकाळी अटक झाली होती. मुनव्वरने बिग बॉस हा रिअॅलिटी शो जिंकल्याबद्दल त्याचं कौतुक होतच आहे. मात्र त्याच्यावर झालेल्या आरोपांबाबतही जाणून घेऊयात…

अन् मुनव्वर युट्यूबर झाला…

2020 पासून मुनव्वरने युट्यूबवर आपले कॉमेडी शो अपलोड करायला सुरुवात केली. अशात त्याच्या या शोला लोकांची पसंती मिळू लागली. पॉलिटिक्स इन इंडिया या त्याच्या व्हीडिओला तर लोकांची प्रचंड पसंती मिळाली. या व्हीडिओने मुनव्वरला लोकप्रियता मिळाली. या व्हीडिओनंतर मुनव्वरला अनेक ठिकाणी स्टँड-अप कॉमेडीसाठी बोलावलं जाऊ लागलं. त्याच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ झाली.

गंभीर आरोप अन् अटक

2021 ला मध्य प्रदेशमध्ये त्याचा एक शो झाला. यावेळी त्याने धार्मिक भावना दुखावल्या, असा आरोप करण्यात आला. या प्रकरणी मुनव्वरला अटक झाली. नंतर सर्वोच्च न्यायालयात त्याच्या जामीनासाठी अर्ज करण्यात आला. त्यानंतर तो तुरुंगाबाहेर आला. 35 दिवस मुनव्वर तुरुंगात होता. पण तुरुंगाबाहेर येताच त्याची लोकप्रियता आणखी वाढली. आधी लॉक अप आणि त्यानंतर आता बिग बॉसचं विजेतेपद मुनव्वरकडे आलं.

बिग बॉस 17 चा विजेता

बिग बॉसच्या घरात प्रेम, दुश्मनी, खेळ अन् बरंच काही घडत असतं. असं असताना तुम्ही तिथे टिकून राहणं महत्वाचं ठरतं. तगडे प्रतिस्पर्धी असतानाही मुनव्वर खेळला, प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली अन् जिंकला. बिग बॉस 17 च्या विजेतेपदाचा किताब मुनव्वरच्या नावावर आहे. अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना हरवत मुनव्वरने ट्रॉफी जिंकली. अन् बिग बॉस 17 ची ट्रॉफी डोंगरीत आली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.