‘बिग बॉस मराठी’च्या घरात होणार मिड वीक एव्हिक्शन; कोणाचा प्रवास संपणार?

आता वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता प्रभू - वालावलकर , धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण यांच्या पैकी एक जण घराबाहेर जाणार आहे. आता घराबाहेर जाणारा सदस्य नेमकं कोण हे आपल्याला आजच्या भागातच समजणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरात होणार मिड वीक एव्हिक्शन; कोणाचा प्रवास संपणार?
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 5:55 PM

Bigg Boss Marathi season 5 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिग बॉस मराठीला ओळखले जाते. बिग बॉस मराठीचे यंदाचे 5 वे पर्व आहे. या पर्वाने टीआरपीचे सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. आता ‘बिग बॉस मराठी’चा खेळ आता अंतिम टप्प्यावर आला आहे. लवकरच हा खेळ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठीचा अंतिम सोहळा रंगणार आहे. त्यातच आता बिग बॉसच्या घरात एक मोठा ट्वीस्ट आल्याचे पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात मिड वीक एव्हिक्शन होणार आहे.

बिग बॉस मराठीचे ५ वे पर्व सुरु झाल्यापासून वेगवेगळे धमाके घडत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांना इतिहासात पहिल्यांदाच अनेक गोष्टी या पर्वात घडताना पाहायला मिळाल्या. त्यातच आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात मिड वीक एव्हिक्शन होणार आहे. नुकतंच ‘बिग बॉस मराठी’चा एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

या व्हिडीओत ‘बिग बॉस’ म्हणत आहेत की संपूर्ण सीझनमध्ये, सगळ्यात कठीण आणि त्रासदायक असतं हे मिड वीक एव्हिक्शन…आणि आज या मिड वीक एव्हिक्शनमध्ये घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचे नाव आहे….” असे म्हणताना दिसत आहेत.

घरातील कोणाचा प्रवास आज संपणार?

या व्हिडीओमुळे आणि अचानक आलेल्या ट्वीस्टमुळे प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे. सध्या सर्वांचेच लक्ष ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागाकडे लागले आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील कोणाचा प्रवास आज संपणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे.

सध्या बिग बॉसच्या घरात वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता प्रभू – वालावलकर , धनंजय पोवार, निकी तांबोळी आणि सूरज चव्हाण हे सदस्य आहेत. यातील निकी तांबोळीला तिकीट टू फिनाले मिळाल्याने ती सेफ झाली आहे. त्यामुळे आता वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता प्रभू – वालावलकर , धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण यांच्या पैकी एक जण घराबाहेर जाणार आहे. आता घराबाहेर जाणारा सदस्य नेमकं कोण हे आपल्याला आजच्या भागातच समजणार आहे.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.