“…तर तो आज कुठल्या कुठे असता”, पॅडी कांबळेंबद्दल विशाखा सुभेदार असं का म्हणाल्या?

विशाखा सुभेदार यांनी पंढरीनाथ कांबळे यांच्यासाठी लिहिलेल्या त्या पोस्टवर अभिनेत्री नम्रता संभेरावनेही कमेंट केली आहे. "दादा हा खरं सोनं आहे, हे मी पाहिलंय", असे नम्रता संभेराव म्हणाली.

...तर तो आज कुठल्या कुठे असता, पॅडी कांबळेंबद्दल विशाखा सुभेदार असं का म्हणाल्या?
Follow us
| Updated on: Sep 15, 2024 | 6:40 PM

Vishakha Subhedar Paddy Kamble Post : बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सुपरहिट ठरताना पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या खेळात येणारे ट्विस्ट, ग्रुपमधील भांडण, होणारी ताटातूट, वाद, घरातील कामांवरुन होणारा वाद आणि गॉसिप्स यामुळे यंदाचे पर्व हे फारच गाजताना दिसत आहे. त्यातच आता मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबतच त्यांनी पंढरीनाथ कांबळे का रडला, याबद्दल भाष्य केले आहे.

नुकतंच बिग बॉसच्या घरात एका टास्कनंतर पंढरीनाथ कांबळे हे रडताना दिसत आहे. यावेळी अंकिता आणि जान्हवी हे त्यांना समजवत असल्याचे दिसत आहे. विशाखा सुभेदारने हाच व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने लांबलचक कॅप्शन दिले आहे. त्यासोबतच तिने पंढरीनाथ कांबळेबद्दल एक किस्सा सांगितला आहे.

विशाखा सुभेदार यांची पोस्ट

“आपला पॅडी का रडला??? खरं सांगू का..ह्यातला हा माणूस त्याच्या जवळच्या अनेक मित्र मंडळींनी पाहिलाय.. अत्यंत प्रामाणिक आणि भावनाप्रधान, मदत करणारा, दयाशील असा आमचा पॅडी… पंढरीनाथ. एक किस्सा आठवला..असंच आम्ही प्रयोगाला जात होतो, रस्ता चुकला म्हणून बस थांब्यावर असलेल्या एका बाईला रस्ता विचारला, तर तिने रस्ता सांगताना अरे तुम्ही तर माझ्याच घरावरून जाणार, माझ्या घरावरून पुढे गेलात ना की मग डावीकडे वळलं की मग पुढे थोडं उजवीकडे वळले की तुमचा ठिकाणी.. असं म्हणाली.

त्यावर पॅडी म्हणाला कीं अहो काकी तुमचं घर आम्हाला कुठे माहिती आहे… हसलो..त्यावर तीने हसून पुन्हा एकदा रस्ता सांगितला.. आणि आणि आम्ही थोडं पुढे गेलो.. त्यांनी मध्येच गाडी थांबवायला सांगितली.. मला म्हणाला अगं आपण त्या बाईच्या घरावरनं जाणार मग आपण तिला का घेतलं गाडीत?? आम्ही मागे गेलो आणि त्या बाईला त्यांनी गाडीत बसवलं.. संपूर्ण प्रवासात आमच्या गप्पा चालल्या होत्या. तिचा नवरा त्यांची मासेमारी ची बोट त्यावरचे कामगार सगळं .. तिने काही आम्हा दोघांना ओळखलं नव्हतं.. तिचं आपल दर काही वाक्यानंतर चालू होतं” बाई पहिल्यांदा एवढ्या मोठ्या गाडीत बसले…” कधीच नाही बसले ग गाडीत.. नुसत्या गाड्या तोंडासमोरून गाड्या जायच्या, बसले कधीच नव्हते आज पहिल्यांदा बसले.. ते पण एवढ्या मोठ्या गाडीत..!

मग तिला तिच्या घराजवळ उतरवलं.. आणि मग तिला पॅडी ने विचारलं, या बाईला ओळखतेस का तू? मग टीव्ही मध्ये शुभविवाह दुपारची सिरीयल लागते त्यात काम करते रागिनी.. हे सांगितल्यावर तिने ओळखलं.. साडीत वेगळ्या दिसता तुम्ही… भूमी आकाश रागिणी वांली सिरीयल.. मी तर गाडीच्या नादात होते तुमच्याकडे तस निरखून पाहिल नाही…असं म्हणाली..आभार वैगरे मागुन ती निघून गेली..

तिचा आनंद पाहून पॅडी ला आनंद होत होता, आपल्या आईला सोडलं असं feel होत होतं.. त्यानंतर पुढच्या प्रवासात आम्ही दोघं ही अबोल .. त्यांन त्याच्या आईला आणि मी माझ्या बापाला कवटाळून प्रवास केला… असा आहे.. पॅडी! दुसऱ्याच्या सुखदुःखात साथ देणारा.. त्याची शिकवण्याची पद्धत अशीच आहे.. थोडी टोमणे मारत मारत पण एकदा का गाठ बसली कीं कायमची.. त्याचे टोमणे बोल अमृताची फळ वाटतात कारण तो फार कमी वेळा तस बोलतो. आणि गरज पडली तरच.. सुरज पहिल्या दिवसापासून बेडवर पॅडीच्या बाजूला झोपला.. त्यावेळी तर त्यांची ओळख ही नव्हती.. हा… आलय? ते पासून त्याची काळजी घेणे त्यात फक्त माया आहे असणार.. त्याच्या वागण्याबोलण्यात कुठला स्वार्थ असता तर तो आज कुठल्याकुठे असता”, असे विशाखा सुभेदार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान विशाखा सुभेदार यांनी पंढरीनाथ कांबळे यांच्यासाठी लिहिलेल्या त्या पोस्टवर अभिनेत्री नम्रता संभेरावनेही कमेंट केली आहे. “दादा हा खरं सोनं आहे, हे मी पाहिलंय”, असे नम्रता संभेराव म्हणाली. सध्या विशाखा सुभेदार यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. यावर असंख्य चाहत्यांच्या कमेंटही पाहायला मिळत आहेत.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...