‘ती’ बंद खोली आज उघडणार…; ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील चक्र बदलणार
Bigg Boss Marathi Chakraview Room : बिग बॉस मराठीच्या घरात आता भाऊची चक्रव्यूह रूम सुरु होणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांचे चक्र आज बदलणार आहे. आजच्या भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार? 'बिग बॉस मराठी'च्या घरातील खाष्ट सासू कोण? वाचा सविस्तर...
बिग बॉस मराठी’च्या घरातील आज अशी रूम उघडणार आहे, या रूममधून घरातली सगळी चक्र बदलणार आहेत. या रूममध्ये गेल्यानंतर सदस्य चक्रावून जाणार आहेत. कारण कोण आपला आहे आणि कोण परका हे सदस्यांना कळणार आहे. ‘भाऊची चक्रव्यूह रूम’ असं या रूमचं नाव आहे. उद्घाटन म्हटलं की पुढारी हवेच…. त्यामुळे छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दराडे या रूमचं उद्घाटन करताना दिसेल. एकंदरीतच ‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग खूपच मजेदार असणार आहे. आता ‘भाऊच्या चक्रव्यूह रूम’ रूममध्ये काय घडतं? हे आजच्या भागात समोर येईल.
महाराष्ट्राचा मूड बिग बॉसच्या सदस्यांना कळणार
‘बिग बॉस मराठी’ च्या घरातील सदस्य काहीही झालं की ‘महाराष्ट्र बघतोय’ हा डायलॉग हमखास मारत असतात. खरं तर महाराष्ट्र खरचं बघतोय सदस्य कशाप्रकारे खेळत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात रितेश भाऊ ‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्यांना पहिल्यांदाच महाराष्ट्र काय बघतोय, महाराष्ट्राचा मूड काय आहे हे दाखवणार आहे.
बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये रितेश देशमुख घरच्या सदस्यांशी संवाद साधतोय. मी तुम्हाला दाखवणारे तुमच्याबद्दल महाराष्ट्र काय बोलतोय ते. असं रितेश म्हणतो. त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेच्या कमेंट्स वाचताना सदस्य दिसून येतात. वैभव कमेंट वाचतो की,”सगळ्यात कमजोर दोन खेळाडू म्हणूजे घन:श्याम आणि वैभव”. पुढे अभिजीत कमेंट वाचतो,”तुझ्यासारख्या पावडरवाल्याला लोळवला”, डीपी वाचतो की “निक्की गँगसोबत भिड”. त्यावर स्पष्टीकरण देत डीपी म्हणतो,”अजून मी कोणासोबत भिडलेलोच नाही”. एकंदरीतच आजच्या भागात सदस्यांना महाराष्ट्राला त्यांच्याविषयी वाटत असलेलं मत कळणार आहे.
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील खाष्ट सासू कोण?
‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश भाऊने सदस्यांच्या आठवड्याभराच्या करामतीचा हिशोब लावला. आजचा ‘भाऊचा धक्का’देखील विशेष असणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज ‘अबीर गुलाल’ या मालिकेची टीम येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज अक्षय केळकर, गायत्री दातार आणि पायल जाधव हे ‘अबीर गुलाल’ मालिकेतील कलाकार जाणार आहेत. त्यावेळी ते सदस्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीतील ट्रॉफी द्यायला लावतील. दरम्यान ‘खाष्ट सासू’ची ट्रॉफी निक्की वर्षा उसगांवकरांना देताना दिसून येईल.