‘त्या’ व्यक्तीमुळे निक्की अन् अरबाजमध्ये दुरावा येणार?; छोट्या पुढारी म्हणाला, मला जरा…
Nikki Tamboli and Arbaz Patel Conflict : बिग बॉस मराठी'च्या घरातील रंगतदार गोष्टी प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत. घरातील सदस्य टास्कदरम्यान भांडणं करत असले तरी एकमेकांसोबत मजा-मस्ती करायला त्यांना आवडते. छोटा पुढारीचा प्रोमो पाहिलात? वाचा सविस्तर....
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनला आता चार आठवडे पूर्ण होत आहेत. गेल्या चार आठवड्यात सदस्यांना ‘बिग बॉस मराठी’चा खेळ खऱ्या अर्थाने कळला आहे. आता घरातील सदस्यांची समीकरणेदेखील बदलत आहेत. त्यामुळे या नव्या सीझनची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. आता अभिजीतमुळे निक्की आणि अरबाज यांच्यात दुरावा येणार असल्याचं म्हटलं जात आहे. निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे. आता ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज निक्कीला म्हणत आहे, ‘तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही एकमेकांसोबत दिवसभर बोला.’
नक्की काय झालं?
अभिजीतवरून निक्की आणि अरबाजमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे. निक्की अभिजीतला म्हणते, ‘त्याचं म्हणणं हेच आहे की आम्ही सगळे याच्या विरोधात आहोत. तर तू का नाही आहेस?’. तर दुसरीकडे अरबाज अंकिताला याबद्दल सांगतो. अभिजीत समोर असेल तर कृपया मध्ये येऊ नकोस. आता मी भिडणार आहे, असं अरबाज सांगतो. निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला चांगलीच खटकत असल्याचं पाहायला मिळत आहे.
छोटा पुढारी काय म्हणाला?
‘बिग बॉस मराठी‘ च्या नवा प्रोमो खूपच गंमतीशीर आहे. या प्रोमोमध्ये छोटा पुढारी अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट करत म्हणतोय,’अंघोळीला लवकर जा म्हणतोय तरी जात नाहीस’. छोटा पुढारीला उत्तर अरबाज देतो.नाही जाणार मी अंघोळीला… माझी अंघोळ झाल्यानंतरच तू जायचं अंघोळीला, असं तो म्हणतो. त्यावर घन:श्याम म्हणतोय,’स्वत:ही जात नाहीस आणि मलादेखील जाऊ देत नाही’. पुढे अरबाज आणि छोटा पुढारीच्यामध्ये पडत सूरज म्हणतो,’तुमच्या नादात खूप वेळ वाया जातोय’. त्यानंतर अरबाज अंघोळीला जातो. दरम्यान छोटा पुढारी म्हणतो,’माझ्या भावा करु दे ना आम्हाला अंघोळ.’
अरबाज आणि घन:श्याम अनेकदा एकमेकांसोबत धमाल करताना दिसून येतात. त्यांची ही धमाल प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते. आजच्या भागातही प्रेक्षकांना त्यांचा हा गंमतीशीर अंदाज पाहायला मिळणार आहे. आजच्या भागात छोटा पुढारी अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट करताना दिसणार आहे.