बहुप्रतिक्षित बिग बॉस मराठीचा सीझन 5 अखेर सुरु झाला आहे. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख हा यंदा सूत्रसंचालन करत आहे. हा सीझन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. या सीझनचं सूत्रसंचालन कोण करणार पासून ते या सीझनध्ये कोण-कोण स्पर्धक असणार? याबाबत वेगवेगळी चर्चा आणि उत्सुकता होती. अखेर हा आजपासून बिग बॉस मराठी सीझन 5 ला सुरुवात झाली आहे.
या सीझनच्या पहिलाच स्पर्धकाने मराठी प्रेक्षकांना एक सुखद धक्का दिला आहे. कारण मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री वर्षा उसगांवकर या सीझनच्या पहिल्या स्पर्धक ठरल्या आहेत.
वर्षा उसगांवकर यांच्यानंतर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू हिने एन्ट्री मारली. अंकिता प्रभू ही सोशल मीडिया स्टार आहे.
अंकिता प्रभू हिच्यासोबत 'रमा राघव' मालिकेचा फेम अभिनेता निखिल दामले याने बिग बॉसच्या कार्यक्रमात एकत्र एन्ट्री मारली.
यानंतर विनोदवीर पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री मारली.
यानंतर 'भाग्य दिले तू मला' सिरियल फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने एन्ट्री मारली.
जान्हवी किल्लेकर हिच्यासोबत 'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्री योगिता चव्हाण यांनी एन्ट्री मारली.
लाखो चाहत्यांच्या 'गळ्यातील ताईत', पहिला इंडियन आयडल, मराठी मुलगा अभिजीत सावंत हा देखील या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.