बाई नाही यायची, तेव्हा देवेंद्रजींकडून डोसे बनवून घ्यायचे, अमृतांच्या उत्तरावर संकर्षण म्हणतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

देवेंद्रजी तुम्हाला कोणता पदार्थ उत्तम करता येतो, असा प्रश्न सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने विचारला. त्यावर "मला चहा, डोसा, अंडा करी, ऑम्लेट, पोहे असे अनेक पदार्थ चांगले बनवता येतात" असं फडणवीसांना सांगितलं. त्यानंतर, तुम्हाला देवेंद्रजींच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो, असा प्रश्न संकर्षणने मिसेस फडणवीसांना विचारला.

बाई नाही यायची, तेव्हा देवेंद्रजींकडून डोसे बनवून घ्यायचे, अमृतांच्या उत्तरावर संकर्षण म्हणतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...
अमृता आणि देवेंद्र फडणवीस किचन कल्लाकार शोमध्ये
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 12:54 PM

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या सुप्रसिद्ध कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. यावेळी मिसेस फडणवीसांनी अनेक धमाल किस्से सांगून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. देवेंद्र फडणवीसही यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. पती देवेंद्र फडणवीसांच्या हातचा आवडता पदार्थ कोणता, हा प्रश्न सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने विचारल्यानंतर “आधी दरवेळेस जेव्हा आमची बाई नाही यायची, तेव्हा देवेंद्रजींकडून मी आवर्जून डोसे बनवून घ्यायचे” असं उत्तर अमृता यांनी दिलं. त्यावर “मला एक सेकंद असं वाटलं, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते होते आणि वहिनी आता म्हणाल्या की बाई यायची नाही तेव्हा त्यांच्या हातून मी करुन घ्यायचे. ही दोन किती वेगळीच वाक्य आहेत ऐकायला” असं संकर्षण म्हणाला. खवय्येगिरी करताना अमृता फडणवीसांनी आपला गाता गळाही मोकळा केला. या कार्यक्रमाचा दुसरा भाग आज (गुरुवारी) रात्री 9.30 वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.

काय किस्सा झाला?

देवेंद्रजी तुम्हाला कोणता पदार्थ उत्तम करता येतो, असा प्रश्न सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने विचारला. त्यावर “मला चहा, डोसा, अंडा करी, ऑम्लेट, पोहे असे अनेक पदार्थ चांगले बनवता येतात” असं फडणवीस म्हणाले. त्यावर, तुम्हाला त्यांच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो, असा प्रश्न संकर्षणने मिसेस फडणवीसांना विचारला. “त्यांच्या हातचा डोसा खूपच चांगला असतो, एकदम क्रिस्प डोसे बनवतात ते. त्यासोबत बटाट्याची भाजी आणि सांबारही छान बनवतात ते.” असं अमृता म्हणाल्या. इतक्यावरच न थांबता, “आधी दरवेळेस जेव्हा आमची बाई नाही यायची, तेव्हा देवेंद्रजींकडून मी आवर्जून डोसे बनवून घ्यायचे” असं उत्तर अमृता यांनी दिलं. त्यावर “मला एक सेकंद असं वाटलं, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते होते आणि वहिनी आता म्हणाल्या की बाई यायची नाही तेव्हा त्यांच्या हातून मी करुन घ्यायचे. ही दोन किती वेगळीच वाक्य आहेत ऐकायला” असं संकर्षण म्हणाला.

फडणवीसांचा पत्नीला सल्ला

कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही अमृता वहिनींना कोणता सल्ला द्याल, असं देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आलं. तेव्हा “तिथे गेल्यावर जे काय पदार्थ तू बनवणार आहेस, त्यासोबत नवनवीन पदार्थ शिकता आले तर शिक आणि ते बनव आणि मला खाण्यापासून रोखू नकोस. खाण्यातली मजा ही जीवनातल्या एका मोठ्या आनंदासारखी आहे. हा आनंद मला सतत मिळत राहायला पाहिजे, याची कृपया काळजी घे” असं भाबडं उत्तर फडणवीसांनी दिलं. तेव्हा सर्वांचीच हसता पुरेवाट झाली.

कोणता पदार्थ बनवणार?

“तुमच्या घरातच अतिशय गोड माणूस आहे, देवेंद्रजी…” असं महाराजांच्या भूमिकेत असलेले प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले म्हणाले. त्यावर “नाही गोड नाहीयेत ते” असं म्हणून अमृतांनी प्रशांत दामलेंना निरुत्तर केलं. मात्र त्यांनी सावरुन घेत, “आम्हाला असं वाटतं, कारण बाहेरचं चित्र देवेंद्रजी गोड आहेत, असं आहे. मग त्यांना सांभाळून घेताना तुम्हाला झणझणीत वागावं लागत असेल. असाच एका झणझणीत पदार्थ तुम्हाला करायचा आहे, तो म्हणजे कोंबडी वडे” असं फर्मान महाराजांनी सोडलं. त्यावर अमृता फडणवीस गोंधळून गेल्या. त्यांच्यासोबत आलेल्या नणंदबाईंनीही “मला नाही माहिती कोंबडी वडे” असं म्हणत हात वर केले. तेव्हा “तुमचा पाठिंबा निखळून पडलाय” असं संकर्षण गमतीने म्हणाला. त्यावर “आता मला कोंबडीसारखं वाटतंय, जी आता कटणार आहे” असं मिश्किल उत्तर अमृतांनी दिलं.

कोंबडी वडा फुलला

या सिच्युएशनवर तुम्हाला कुठलं गाणं आठवतंय का, असा प्रश्न संकर्षणने विचारला. मला मात्र तुम्हाला पाहून ये नयन डरे डरे हे गाणं सुचत असल्याचं तो म्हणाला. तेव्हा अमृता फडणवीस यांनी हजरजबाबीपणे मोगरा फुलला या गाण्याच्या चालीवर एक गीत तयार केलं. कोंबडी वडा फुलला, कोंबडी वडा फुलला, वडा बनवताना घाम आता सुटला, असं गमतीदार गाणं गायलं. \

एका बैठकीत किती पुरणपोळ्या?

एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? या प्रश्नावर ते 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं. तर लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती, या प्रश्नावर त्यांना 30-35 पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असं उत्तर मिसेस फडणवीस यांनी दिलं.

संबंधित बातम्या :

देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, अमृता फडणवीसांची किचनमध्ये ‘कल्ला’कारी

अमृता फडणवीसांचं व्हॅलेंटाईन स्पेशल गीत, नवा लूकही चांगलाच चर्चेत

बाहेरुन पाठिंबा चालेल का? पंकजांचा प्रश्न, रोहित पवार म्हणतात, आताचं सेशन बघता भाजपचा बाहेरुन पाठिंबा वाटतोय

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.