गुलीगत फेम सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी’चा हा नवा सिझन गाजवतोय. त्याच्या डायलॉग्सची सर्वत्र जोरदार चर्चा असते. सूरज चव्हाण आणि छोटा पुढारी यांच्यात खास बोलणं झालं. सूरज आणि घन: श्याम यांच्यात लग्नावरून बोलणं झालं. ‘बिग बॉस मराठी’चे नवे पर्व चांगलेच गाजाताना आपल्याला दिसत आहे. या नव्या पर्वावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम करत आहेत. तसेच बिग बॉसच्या घरात सदस्स एकमेकांवर प्रेम ही करतात आणि टास्कमध्ये एकमेकांविरोधत उभे देखील राहतात. पण सध्या सूरज चव्हाण आणि घन:श्याम या दोघांमध्ये लग्नावरून बोलणं झालं. ते सध्या चर्चेत आहे.
‘बिग बॉस मराठी’ च्या आजच्या भागात गार्डन एरियात सूरज आणि घनश्याम यांच्यामध्ये संवाद झाला. सूरजच्या लग्नाबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. आजच्या अनसीन अनदेखामध्ये प्रेक्षकांना हे पाहता येईल. तुझ्या लग्नात करवला नको का? मग मी आहे ना.. मग तूझ्या लग्नात आपल्याला तूझ्या आवडीचे कपडे घ्यायला लागणार. आम्हाला वहिनी पाहिजे बाबा.. मेकअप करायला.. आम्हाला हक्काची वहिनी हवी आहे. तुला एवढे शॉपिंगचे समजत नाही आमची वहिनी आम्हाला सांगेल भाऊजी ही बूटे घ्या. तुझ लग्न एकदम दणक्यात करायचे. डिजे लावायचा, घोडा लावायचा…, असं घनश्याम सूरजला म्हणतो.
त्यावर सुरज म्हणतो, “घोडा लावायचा नाही.. घोडा नाचवायचा रे!” अरे घोडा असा आणायचा त्यावर तू बसायचे. घोडा असा मस्त नाचणारा असला पाहिजे… फक्त तुला पाडले नाही पाहिजे. सगळा खर्च आपण करू. नवरीकडच्या लोकांनी खर्च नाही केला तरी चालेल आणि सगळ्यांत महत्वाचे वहिनी आम्ही ठरवणार तू नाही ठरवायची. आम्ही बघू आम्हाला वहिनी कशी हवी ते, असं घन:श्याम म्हणतो. त्यानंत तुझ्या लग्नात मी किती दिवस आधी येऊ?, असंही घनश्याम विचारतो. एक महिना आधी ये तू. घालू मस्त राडा आपण, असं सूरज त्याला म्हणतो.
सूरज चव्हाण बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन झाला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात आता रंगत आली आहे. आमचा कॅप्टन म्हणजे सूरज…, असं बिग बॉसच्या घरातील सदस्य म्हणताना दिसत आहे. सूरजच्या कॅप्टन्सीचा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.