‘अबीर गुलाल’ मालिकेत नवं वळण; ते सत्य समोर आल्यावर काय असेल शुभ्रा आणि श्रीची प्रतिक्रिया?

Abir Gulal Serial Twist : 'अबीर गुलाल' मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. या मालिकेचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. दोन अनोळखी मुलींची नशीब बदलणारं सत्य अखेर श्रीसमोर येणार आहे. श्रीसमोर येणार 'ते' सत्य... काय असेल शुभ्रा आणि श्री या दोघींची प्रतिक्रिया? वाचा सविस्तर बातमी...

'अबीर गुलाल' मालिकेत नवं वळण; ते सत्य समोर आल्यावर काय असेल शुभ्रा आणि श्रीची प्रतिक्रिया?
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 3:00 PM

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’ ही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आह मालिकेत निरनिराळे ट्विस्ट आणले जात आहेत. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना आवडते आहे. मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे. 24 वर्षांपूर्वी दोन अनोळखी मुलींचं नशीब एका रात्रीत बदललं होतं. एक नर्स या अदलाबदलीला कारणीभूत असते. पण आता हे सत्य समोर आलं आहे. गायकवाडांचं घर हेच आपलं हक्काचं घर आहे हे अखेर श्रीसमोर येणार आहे. आजच्या या विशेष भागात प्रेक्षकांना हा ट्विस्ट पाहायला मिळेल.

‘अबीर गुलाल’ मालिकेत नवा ट्विस्ट

नर्समुळे गरीब घरातील शुभ्रा श्रीमंत घरात जाते तर श्रीमंत घरातील श्री गरीब घरात लहानाची मोठी होते. पण या सगळ्याला कारणीभूत असणारी नर्स श्रीला आता तिचा हक्क आणि तिच्या खऱ्या आई-वडिलांबद्दल सांगणार आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून श्रीला मोठे धक्के मिळत आहेत. पण स्वत:ची खरी ओळख सांगणारा हा मोठा धक्का श्री पचवू शकेल का? हे जाणून आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

श्री काय म्हणाली?

‘अबीर गुलाल’ मालिकेत आलेल्या सध्याच्या ट्विस्टमुळे श्री आणि शुभ्राचं आयुष्य बदलणार आहे. मी जर माझा खरा हक्क मागितला तर गायकवाड आई, बाबा आणि घर सगळं मिळेल. पण शुभ्रा मॅडमचं अख्ख आयुष्यचं उद्धवस्त होऊन जाईल. शुभ्रा मॅडमच्या साखरपुड्यात कोणतंही विघ्न यायला नको. पण हे सगळं खरं ऐकून काही वेगळचं घडलं तर, असं श्री म्हणाली आहे.

माझ्यामुळे आधीच सगळ्यांना खूप त्रास झाला आहे. आई अंबाबाई कसली परीक्षा घेत आहेस? म्हणजे आयुष्यभर ज्यांची वाट पाहिली, ज्या गोष्टीसाठी मी तडफडत राहिले ते सगळं सुख, आनंद तू असा माझ्यासमोर मांडून ठेवला आहेस. पण हे सगळ्यांना कळल्यानंतर मला सगळे आपलं मानतील का? मला आपलं करुन शुभ्रा मॅडमला त्यांनी दूर केलं तर?, असं श्री या मालिकेत म्हणताना दिसणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.