Kapil Sharma on wheelchair | कॉमेडियन कपिल शर्माच्या मणक्याला दुखापत, फिरण्यासाठी घ्यावी लागतेय व्हीलचेअरची मदत!

कॉमेडियन कपिल शर्माला (Kapil sharma)  मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले होते. मात्र, यावेळी कपिलला पाहून चाहते प्रचंड घाबरून गेले आहेत.

Kapil Sharma on wheelchair | कॉमेडियन कपिल शर्माच्या मणक्याला दुखापत, फिरण्यासाठी घ्यावी लागतेय व्हीलचेअरची मदत!
कपिल शर्मा
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 4:28 PM

मुंबई : सोमवारी कॉमेडियन कपिल शर्माला (Kapil sharma)  मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले होते. मात्र, यावेळी कपिलला पाहून चाहते प्रचंड घाबरून गेले आहेत. याचे कारण म्हणजे, कपिल यावेळी व्हीलचेअरमध्ये दिसला आणि त्याच्याबरोबर असलेला एक व्यक्ती. ती व्हीलचेअर ढकलत त्याला, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत होतं. त्या माणसाने पीपीई किट देखील घातले होते. कपिलचा हा अवतार पाहून त्याच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे (Comedian Kapil Sharma on wheelchair spotted at airport).

कपिलला या अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांच्या लाडक्या कलाकारांचे हे काय झाले, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. यादरम्यान कपिलने पापाराझी पाहून फारशी प्रतिक्रिया दिली नाही. यावेळी कपिलने ब्लॅक कलरचा ट्रॅक सूट परिधान केला होता. तर, पांढऱ्या रंगाचा मास्क घातला होता.

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत त्याने व्हीलचेअरची मदत घेण्याचे कारण सांगितले. कपिल म्हणाला, ‘मी ठीक आहे. फक्त पाठीला दुखापत झाली आहे. यामुळे मला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागतो आहे. ही दुखापत व्यायाम करताना झाली आहे. थोड्याच दिवसांत मी पूर्ण बरा होईन.’ अभिनेता कपिल शर्माला स्लिप डिस्कची समस्या देखील आहे. काही वर्षांआधी या त्रासामुळे त्याला काही महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागला होता.

‘कपिल शर्मा शो’ ऑफ एअर!

नुकताच काही दिवसापूर्वी कपिलचा ‘द कपिल शर्मा शो’ बंद झाला होता. मात्र, हा शो कायमचा बंद झाला नसून केवळ काही कालावधीसाठी बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. चाहत्यांना शो बंद होण्याचे कारण सांगताना कपिलने म्हटले होते की, त्याची पत्नी गिन्नी चतरथ गर्भवती असल्याने कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी तो काही काळासाठी शोमधून ब्रेक घेत आहे. त्यानंतर कपिलने त्याच्या घरी एका चिमुकल्याचे आगमन झाल्याची माहिती सोशल मीडियावर एक ट्विट करत दिली होती. गोड बातमी ऐकताच कपिलवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षावही झाला होता(Comedian Kapil Sharma on wheelchair spotted at airport).

नव्या दमाने परत येऊ!

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री भारती सिंहने एका मुलाखतीत या शोबद्दल सांगितले होते की, ‘हो, आम्ही ब्रेकवर आहोत पण काहीतरी नवीन करण्यासाठी! आम्ही ब्रेक घेत आहोत जेणेकरून आम्ही स्वतःस अपग्रेड करू शकू. नवीन पात्रांवर काम करण्यासाठी आमची टीम उत्साहित आहे. येत्या दोन महिन्यांत केवळ एखादाच चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चॅनेलने शोला पुन्हा ब्रेक देण्याचे ठरवले आहे. मात्र, असे नाही की या दोन-तीन महिन्यांच्या विश्रांतीच्या वेळी आम्ही पूर्णपणे सुट्टीवर जाऊ. या काळात आम्ही एक टीम म्हणून नवीन पात्रांवर काम करू आणि अधिक जोमाने परत येऊ. प्रामाणिकपणे, आम्ही सर्व यासाठी उत्साही आहोत.’

याशिवाय कपिल नेटफ्लिक्सवरही दिसणार आहे. तो कपिलने स्वत: नेटफ्लिक्समध्ये दिसणार असल्याची माहिती दिली होती. पण तो एखाद्या चित्रपटात, शोमध्ये किंवा वेब सीरीजमध्ये दिसणार आहे, याबद्दल अद्याप काही माहिती नाही.

(Comedian Kapil Sharma on wheelchair spotted at airport)

हेही वाचा :

The Kapil Sharma Show | चाहत्यांसाठी मोठा धक्का, कपिल शर्माचा शो बंद होणार?

Finally | कपिल शर्माची चाहत्यांना मोठी गुड न्यूज, नववर्षात या सीरीजमधून धमाका करण्यास सज्ज!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.