Kapil Sharma | कपिल शर्माच्या मुलाचं नाव ऐकलंत का? ‘या’ नावाचा ‘विजया’शी आहे खास संबंध!

प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ (Ginni Chatrath) फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. गिन्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

Kapil Sharma | कपिल शर्माच्या मुलाचं नाव ऐकलंत का? ‘या’ नावाचा ‘विजया’शी आहे खास संबंध!
परिवारासमवेत कपिल शर्मा
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 11:17 AM

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ (Ginni Chatrath) फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. गिन्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दोघांनाही आधी एका एक मुलगी आहे. जेचे नाव ‘अमायारा’ आहे. मात्र, अद्याप कपिलने मुलाचे नाव व फोटो जाहीर केले नव्हते. पण, आता अखेर कपिलने मुलाचे नाव जाहीर केले आहे. वास्तविक, गायिका नीती मोहनने (Niti Mohan) कपिलच्या वाढदिवशी त्याला शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली होती आणि यावेळी तिने मुलाचे नावही विचारले होते (Comedian Kapil Sharma revels his baby boy name trishaan).

नीती मोहनने ट्विट केले होते की, ‘हॅपी बर्थडे कपिल पाजी. तुला आणि तुझ्या कुटुंबाला खूप प्रेम. आता तरी बाळाचे नाव सांग!’ कपिलने नितीच्या या ट्विटला उत्तर देताना लिहिले, ‘धन्यवाद नीतू, आशा आहे की, आपण स्वतःची काळजी घेत आहात. आम्ही मुलाचे नाव ‘त्रिशान’ असे ठेवले आहे.’ या नावाचा खास अर्थ आहे. त्रिशान म्हणजे विजय, यश. खरोखरच कपिलने आपल्या मुलाचे नाव खूपच विचार करून ठेवले आहे.

पाहा कपिलची पोस्ट

कपिल पुन्हा येणार चाहत्यांच्या भेटीला!

कपिल शर्माचा शो गेल्या महिन्यात ऑफ एअर झाला होता. तथापि, आता हा शो कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. हा शो नवीन कलाकार व नव्या टीमसह परत येणार आहे. हा शो नेहमीप्रमाणे प्रेक्षकांसोबत चित्रित व्हावा, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. पण वाढत्या कोरोनाच्या उद्रेकामुळे प्रेक्षकांसह हा शो सुरू करण्यात बरीच अडचणींना सामोरे जावे लागू शकते, म्हणूनच टीम तयार झाली तरी दोन महिन्यांआधी हा शो टीव्हीवर परत आणणे शक्य नाही (Comedian Kapil Sharma revels his baby boy name trishaan).

नवं टॅलेंट, नवे कलाकार जोडले जाणार

द कपिल शर्मा शो मध्ये नवं टॅलेंट, नवे कलाकार आणि नवे स्क्रिप्ट रायटर्सचं स्वागत करण्यासाठी मी उत्साहीत आणि आनंदी आहे. एन्टरटेन्मेंटसाठी खरी इच्छा दाखवणारे आणि समान विचारधारा असलेले टॅलेंटेड लोकांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे, असं कपिल शर्माने म्हटलं होतं. कपिल शर्मा शोचं प्रॉडक्शन सलमान खान टेलीव्हिजन आणि Banijay Asia कडून केलं जातं.

सलमान खान टेलीव्हिजनचे सीईओ नदीम कोरीशी यांनी सांगितलं की, ‘कपिल शर्मा आणि त्यांच्या शोचे अन्य कलाकार देशभरात या शोमुळे ओळखले जातात. आम्ही प्रेक्षकांना काही नावीन्यपूर्ण आणि रोमांचक देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. टीमचे आताचे आणि नव्याने जोडले जाणाऱ्या सर्व लोकांचा उद्देश्य हा फक्त मनोरंजन असणार आहे’.

नव्या दमाने परत येऊ!

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री भारती सिंहने एका मुलाखतीत या शोबद्दल सांगितले होते की, ‘हो, आम्ही ब्रेकवर आहोत पण काहीतरी नवीन करण्यासाठी! आम्ही ब्रेक घेत आहोत जेणेकरून आम्ही स्वतःस अपग्रेड करू शकू. नवीन पात्रांवर काम करण्यासाठी आमची टीम उत्साहित आहे. येत्या दोन महिन्यांत केवळ एखादाच चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चॅनेलने शोला पुन्हा ब्रेक देण्याचे ठरवले आहे. मात्र, असे नाही की या दोन-तीन महिन्यांच्या विश्रांतीच्या वेळी आम्ही पूर्णपणे सुट्टीवर जाऊ. या काळात आम्ही एक टीम म्हणून नवीन पात्रांवर काम करू आणि अधिक जोमाने परत येऊ. प्रामाणिकपणे, आम्ही सर्व यासाठी उत्साही आहोत.’

(Comedian Kapil Sharma revels his baby boy name trishaan)

हेही वाचा :

Akshay Kumar | कोरोनाची लागण झालेल्या ‘खिलाडी’ कुमारची तब्येत खालवली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल!

Star Pravah Parivaar | स्टार प्रवाह परिवारमध्ये अरुंधती, माऊ, जयदीप सर्वोत्तम; विजेत्यांची संपूर्ण यादी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.