कोरोनामुळे जेष्ठ कलाकारांवर घरी बसण्याची वेळ, ‘तारक मेहता’चे नट्टूकाका ते ‘वागळे’च्या अम्मांची व्यथा!

जरी शूटिंग लोकेशन आता शिफ्ट झाले असले, तरी कोरोनाचा हा कहर थांबवलेला नाही, ही प्रकरणे संपूर्ण भारतभरात वाढत आहेत आणि यामुळे आता ज्येष्ठ कलाकारांना काम मिळणे कठीण झाले आहे.

कोरोनामुळे जेष्ठ कलाकारांवर घरी बसण्याची वेळ, ‘तारक मेहता’चे नट्टूकाका ते ‘वागळे’च्या अम्मांची व्यथा!
जेष्ठ कलाकार
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 1:10 PM

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे आता महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाऊन लावला आहे. मुंबईतील वाढती कोरोना प्रकरणे आणि सरकारने लावलेल्या लॉकडाऊनमुळे टीव्ही मालिका निर्मात्यांनी त्यांच्या मालिकेचे शूटिंग महाराष्ट्राबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. जरी शूटिंग लोकेशन आता शिफ्ट झाले असले, तरी कोरोनाचा हा कहर थांबवलेला नाही, ही प्रकरणे संपूर्ण भारतभरात वाढत आहेत आणि यामुळे आता ज्येष्ठ कलाकारांना काम मिळणे कठीण झाले आहे. तर काही कलाकारांनी या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन शूटिंगपासून अंतर ठेवण्याचे ठरवले आहे (Corona Crisis senior actor facing financial issues).

स्वाती चिटणीस

स्टार प्लसची मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता ही’मध्ये कार्तिकच्या आजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना एकदा कोरोना झाला होता. या क्षणी, त्यांनी लसीकरण पूर्ण होईपर्यंत शूटिंगपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या म्हणाल्या की त्या आता दुसर्‍या डोसची वाट पाहत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच त्या स्वत: शूटवर परत येतील. पण तोपर्यंत त्यांना स्वतःच्या घरात रहायचं आहे. अशावेळी त्यांचे निर्माते राजन शाही यांनीही स्वातीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अंजन श्रीवास्तव आणि भारती आचरेकर

काही दिवसांपूर्वी सोनी सबवर ‘वागले की दुनिया’ सीरियलमध्ये अनेक कोरोना केसेस सापडल्या होत्या. सध्या या मालिकेचे शुटींग सिल्वासामध्ये सुरु आहे. पण या मालिकेतले सर्वात ज्येष्ठ व महत्त्वाचे सदस्य या संघाचा भाग नाहीत. अभिनेता अंजन श्रीवास्तव आणि भारती आचरेकर म्हणजेच मिस्टर आणि मिसेस वागळे यांनी शूटिंगपासून लांब राहण्याचे ठरवले आहे. अंजन श्रीवास्तव म्हणाले, ‘मागील वेळी बर्‍याच क्रू मेंबर कोरोना झाला होता. तथापि, आता सर्व निगेटिव्ह आहेत. पण आम्हाला वाटते की, गोष्टी योग्य होईपर्यंत आपण थोडा वेळ थांबायला पाहिजे.’(Corona Crisis senior actor facing financial issues)

अरविंद वैद्य

अनुपमाच्या बापूजींची भूमिका साकारणारे अभिनेता अरविंद वैद्य यांनीदेखील शूटिंगपासून दूर राहणे पसंत केले आहे. आजच्या परिस्थितीत आरोग्य सर्वात प्रथम आहे, असा त्यांचा विश्वास आहे. आमच्या टीममधील बरेच लोक गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून येत आहे. म्हणून मी निर्णय घेतला आहे की, परिस्थिती सुधारल्याशिवाय मी शूट करणार नाही.

घनश्याम नायक (नट्टू काका)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नट्टू काकाची भूमिका करणारे अभिनेते घनश्याम नायक गेल्या एक महिन्यापासून कामाच्या प्रतीक्षेत आहे. ते म्हणाले, एका महिन्याहून अधिक काळ झाला आहे आणि मी अद्याप घरीच बसलो आहे. शोमध्ये माझा ट्रॅक कधी सुरू होईल हे माहित नाही, कारण आता शूटिंगही थांबली आहे. निर्मात्यांनी शोचे लोकेशन शिफ्ट करण्याचा निर्णयही घेतलेला नाही. मी मार्चमध्ये एक एपिसोड शूट केला आणि तेव्हापासून मी घरीच आहे. मला खात्री आहे की निर्माते लवकरच शोमध्ये माझा ट्रॅक सुरू करतील आणि नट्टू काका गावातून मुंबईत कसे परत येतील हे दाखवतील.

(Corona Crisis senior actor facing financial issues)

हेही वाचा :

‘तुमच्याकडे करोडो रुपये, ऑक्सिजन सिलेंडर देऊन देशाची मदत करा’, राखी सावंतचा कंगनावर हल्लाबोल!

Divorce Paper | कपूर घरण्याला नवं टेन्शन! नेमकी कुठे ठेवलीयत राजीव कपूरच्या घटस्फोटाची कागदपत्र?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.