निक्कीसोबत बसून डीपीदादानं घेतला बायकोशी पंगा; मंगळसूत्र दाखवत वहिनी म्हणाल्या…
Dhananjay Powar and Nikki Tamboli Video : बिग बॉस मराठीमधील स्पर्धक धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर धनंजयची पत्नी कल्याणीने एक व्हीडिओ शेअर करत त्याला उत्तर दिलं आहे. नेमकं काय घडलंय? वाचा सविस्तर...
बिग बॉस मराठीची सध्या जोरदार चर्चा आहे. बिग बॉसच्या घरात काय घडतंय? हे जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडतं. सध्या बिग बॉसच्या घरातील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ आहे कोल्हापूरचा ढाण्या वाघ अर्थात धनंजय पोवार आणि निक्की तांबोळीचा… या व्हीडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. हा व्हीडिओ इतका व्हायरल झालाय की धनंजय पोवारची पत्नी कल्याणीने या सगळ्याला उत्तर देणारा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. गळ्यातील मंगळसूत्र दाखवत कल्याणीने धनंजय अन् निक्कीच्या व्हीडिओला बिग बॉसच्या घराबाहेरून उत्तर दिलंय.
डीपीदादा आणि निक्कीचा व्हीडिओ नेमका काय?
डीपीदादा अर्थात धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सध्या बिग बॉसच्या घरात आहेत. बिग बॉसच्या घरात जेवतानाचा हा व्हीडिओ आहे. यात निक्कीने हातात ताट पकडलं आहे आणि त्यात डीपी आणि निक्की जेवत आहेत. हा एक कॉमेडी व्हीडिओ आहे. ज्यात बायकोला उद्देशून धनंजय बोलताना दिसतोय. जर माझी बायको हे बघत असेल तर तिला मला सांगायचं आहे की हे बघ… तू जेवताना सारखं घ्या की खा की, करत असतेस. पण दोन हिंदी आणि तीन दाक्षिणात्य सिनेमे केलेली हिरोईन माझ्यासाठी ताट घेऊन उभी आहे, असं धनंजय म्हणतो.
कल्याणीचं उत्तर
डीपी आणि निक्की तांबोळी यांचा हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर धनंजयची बायको कल्याणीने एक व्हीडिओ शेअर केलाय. यात तिने धनंजयला उत्तर दिलंय. हो बघतेय मी… ती हिरोईन ताट घेऊन तुमच्यासमोर उभी असेल. पण मी ताट घेऊन तुम्हाला भरवलं आहे, असं कल्याणी म्हणतेय. माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र हे साताजन्माचं आहे…, अशीही कल्याणी त्याला आठवण करून देते. निक्की धनंजयला खावा की म्हणते… त्यावरही कल्याणीने एक्सप्रेशन्समधून उत्तर दिलं आहे.
View this post on Instagram
या व्हीडिओवर नेटकऱ्यांनीही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. हा व्हीडिओ बघून घरी गेल्यावर दादाचा डीजे वाजणार…, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय. धन्या रोजच्या भाकरीला महाग होशील, अशीही कमेंट नेटकऱ्याने केलीय. धनु भाऊ अशा भरपुर मस्तानी येतील आणि जातील पण शेवटी घरची काशी ती काशी तिने नाही भरवलं तर बाजीराव उपाशी, असंही धनंजयच्या चाहत्याने म्हटलं आहे.