डीपीदादा रॉक्स… धनंजय पोवारने गाठला महत्वाचा टप्पा
Dhananjay Powar : कोल्हापूरचा डीपीदादा अर्थात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धनंजय पोवारने महत्वाचा टप्पा गाठला आहे. त्याच्या सोशल मीडियावरून चाहत्यांना ही माहिती देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये काय? नेमकं काय घडलंय? बिग बॉसच्या घरात धनंजय कसा खेळतोय? वाचा सविस्तर बातमी...
सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीचा बोलबाला असल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांबाबत सोशल मीडियावर चर्चा होत आहे. बिग बॉसच्या घरातील एक चर्चेत असणारा सदस्य म्हणजे ‘कोल्हापूरचा ढाण्या वाघ’ अर्थात धनंजय पोवार… बिग बॉसच्या घरातील त्याचा खेळ त्याच्या चाहत्यांना आवडतो आहे. त्याचा बिग बॉसच्या घरातील सहज वावर प्रेक्षकांना भावतो आहे. असं असतानाच धनंजयच्या सोशल मीडियावरून एक माहिती शेअर करण्यात आली आहे. बिग बॉसच्या घरात असताना डीपीदादाने खासगी आयुष्यात एक महत्वाचा टप्पा गाठला आहे.
धनंजय पोवारने गाठला महत्वाचा टप्पा
धनंजय पोवार हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि यूट्यूबर आहे. या यूट्यूब चॅनेलवर कॉमेडी व्हीडिओ धनंजय शेअर करत असतो. बिग बॉसच्या घरात असताना धनंजयच्या यूट्यूब चॅनेलने महत्वाचा टप्पा गाठला आहे. 1 मिलियन अर्थात दहा लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा धनंजय पोवारच्या यूट्यूब चॅनेलने गाठला आहे. याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
यूट्यूबवर आज आपले एक मिलियन सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत. तरी आमच्यावर प्रेम आणि सपोर्ट दाखवल्याबद्दल माझ्या परिवाराकडून आभार… अशी पोस्ट धनंजयच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी धनंजयचं अभिनंदन केलं आहे. डीपीदादा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी या पोस्टमध्ये वडिलांचा उल्लेख असायला हवा होता, असं म्हटलं आहे. कितीही मोठे झालात तरी वडिलांना विसरू नये….या पोस्टमध्ये वडिलांचा फोटो पाहिजे होता डीपीदादा, अशी कमेंट त्याच्या चाहत्याने केलीय.
View this post on Instagram
कोल्हापूरचा रांगडा गडी आणि लोकप्रिय रील स्टार धनंजय पोवारने यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश करून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. एक साधा उद्योजक ते रील स्टार असा प्रवास करणाऱ्या धनंजयने आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आपलं स्थान निर्माण केलं आहे. बिग बॉसमधून तो चाहत्यांचं मनोरंजन करत अआहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात हटके स्टाईलने खेळ खेळत आहेत. त्याचा ‘तिखट कोल्हापुरी’ अंदाज प्रेक्षकांना भावतो आहे.