Video : ‘कभी खुशी कभी गम’ म्हणत ‘आई कुठे काय करते’तील कलाकारांनी शेअर केला मजेदार रील, पाहा व्हिडीओ

प्रेक्षकांची लाडकी संजना अर्थात अभिनेत्री रुपाली भोसलेनं सोशल तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मजेदार रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या रिलमध्ये संजना आणि अरुंधती सोबतच अनेक कलाकार 'कभी खुशी कभी गम' हे गाणं गाताना दिसत आहेत. (Funny reel shared by the cast of 'Aai Kuthe Kay Karte' saying 'Kabhi Khushi Kabhi Gham', watch the video)

Video : 'कभी खुशी कभी गम' म्हणत 'आई कुठे काय करते'तील कलाकारांनी शेअर केला मजेदार रील, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 7:21 AM

मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर संजनाला वेध लागले ते लग्नाचे. गेली कित्येक वर्ष ती ज्या दिवसाची वाट पहात होती तो दिवस आता जवळ आलाय. मालिकेत गोंधळ सुरू असला तरी तुमचे लाडके कलाकार ऑफस्क्रीन मात्र धमाल करताना दिसत आहेत. पडद्यावर कितीही वाद असले तरी कलाकार त्या भूमिकेतून बाहेर पडले की अगदी खेळीमेळीच्या वातावरणात राहतात. आई कुठे काय करतेच्या सेटवर तर नेहमीत धमाल होताना दिसते. या मालिकेतील कलाकार सेटवरच्या गमती-जमती सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

प्रेक्षकांची लाडकी संजना अर्थात अभिनेत्री रुपाली भोसलेनं सोशल तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मजेदार रील व्हिडीओ शेअर केला आहे. या रिलमध्ये संजना आणि अरुंधती सोबतच अनेक कलाकार ‘कभी खुशी कभी गम’ हे गाणं गाताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

संजनाचा ब्रायडल लूक

अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर संजनाला वेध लागले ते लग्नाचे. गेली कित्येक वर्ष ती ज्या दिवसाची वाट पहात होती तो दिवस आता जवळ आलाय. 30 ऑगस्ट ही या दोघांच्या लग्नाची तारीख पक्की झाली आहे. अनिरुद्धसोबत लगीनगाठ बांधून देशमुखांच्या घरात गृहप्रवेश करण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होणार का याची उत्सुकता आता वाढली आहे. लग्नामध्ये संजना नटण्याची सर्व हौस भागवून घेणार आहे. गुलाबी रंगाच्या साडीतला तिचा ब्रायडल लूक सध्या व्हायरल होतोय. आई कुठे काय करते मालिकेतल्या संजनाच्या लूकची नेहमीच चर्चा राहिली आहे. संजनाचं स्टाइल स्टेटमेण्ट तिच्या चाहत्या फॉलो करताना दिसतात. संजनाची भूमिका साकारणाऱ्या रुपाली भोसलेला देखिल फॅशनचे नवनवे ट्रेण्ड ट्राय करायला खूप आवडतं.

त्यामुळे अनिरुद्धसोबतच्या लग्नासाठी तिने खास तयारी केलीय. गुलाबी रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. अनिरुद्धच्या नावाची मेहेंदीही तिच्या हातावर सजली आहे. आता या दोघांचं लग्न पार पडणार की इथेही नवा ट्विस्ट येणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेल.

पाहा संजनाचा वेडिंग लूक

Rupali Bhosale

संबंधित बातम्या

Birthday Special : ‘आय कॅन डू दॅट’च्या सेटवर पहिली भेट ; फोटो शेअर करत प्रेमाची कबुली, वाचा फरहान आणि शिबानीची ‘प्यारवाली’ लव्हस्टोरी

Aai Kuthe Kay Karte : लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई…, संजनाचा वेडिंग लूक पाहिलात का?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.