‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत रंगणार कुस्तीचा सामना; अधिपती म्हणाला, सलग 3 दिवस…
Hrishikesh Shelar talk About Tula Shikvin Changlach Dhada : अभिनेता हृषिकेश शेलार याने 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतील शुटिंगच्या अनुभवाबद्दल बोलता झाला आहे. त्याने कुस्तीचा सिन शूट करतानाचा अनुभव सांगितला आहे. हृषिकेश काय म्हणाला? वाचा सविस्तर...
झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. भुवनेश्वरीने अधिपती आणि अक्षराला 10 दिवसांचं आव्हान दिलं आहे. घराबाहेर राहून दोघांना सिद्ध करून दाखवायचे होते की, ते आपल्या संसाराची जबाबदारी घेण्यास सक्षम आहेत. या मालिकेत नुकतंच कुस्तीचा एक सीन दाखवला गेला. या सिनच्या शुटिंग दरम्यानचा अनुभव अधिपती अर्थातच अभिनेता हृषिकेश शेलार याने सांगितला आहे. कुस्तीचा अनुभव खूप छान होता. सलग तीन दिवस शूट करत होतो थकलो होतो. पण जेव्हा तो सीन शूट करून झाला. तेव्हा खूप छान वाटलं, असं हृषिकेश म्हणाला.
हृषिकेश शेलार काय म्हणाला?
मानसिकरित्या काटक झालो आणि शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे याची पुन्हा आठवण या सीनने करून दिली. मला आनंद आहेत कि मी यशस्वीपणाने कुस्ती सीन करू शकलो. मला फारसं कुस्तीचं ज्ञान नाही. पण एकदा लहानपाणी गावाकडे असताना मी कुस्ती खेळलो होतो. त्यात मला 21 रुपये बक्षीस मिळालं होतं, असं हृषिकेश शेलार म्हणाला.
कुस्तीचे डाव किंवा तालिमीत मी शिकलो नाही. मी व्यायाम नियमित पणे अनेक वर्ष करत आहे. मग ते घरी असो, किंवा व्यायामशाळेत. व्यायामाची मला आवड आहे आणि त्याचा मला इथे फायदा झाला आहे. सीनसाठी सेट वरती जे तालिमीतली लोक आले होते. मी त्याच्याकडून काही डाव शिकलो आणि त्याचा उपयोग मी सीनमध्ये तिथल्यातिथेच त्याचा वापर करायचो. माझा एकदा ॲक्सीडेन्टमध्ये पायाचा लिगामेंट टियर झाला होता. काही वर्षां पूर्वी तर त्याची काळजी घ्यावी लागत होती. हा सीन करण्यासाठी फक्त माझी एकट्याची मेहनत नाही पूर्ण टीम मुळे हा सीन अजून उत्तम पणे झाला, असंही हृषिकेशने सांगितलं आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ नव्या वळणावर
अधिपती-अक्षराच्या या कसोटीत खूप आव्हान ही येतात. जिथे कुस्तीमध्ये जिंकलेले पैसे दुर्गेश्वरी-चंचला चोरतात. भुवनेश्वरी अक्षरा अधिपती ज्या काकांच्या घरात राहतात त्या काकांना दोघांकडून घराचं 10 हजार भाडं वसूल करायला लावते. पण सगळी आव्हान पूर्ण करुन ते दोघे घरी येतात. घरात सगळे त्यांचं गोड कौतुक, स्वागत करतात. कुस्तीच्या सीनसाठी केलेली मेहनत आणि त्याचा अनुभवाबाबत हृषिकेश शेलार बोलता झाला.