‘बिग बॉस’मध्ये गेले ही माझी चूकच झाली, कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी व्यक्त केल्या भावना!
बिग बॉसच्या घरात संतांची शिकवण देण्याचा प्रयत्न केला, मात्र बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे वारकरी संप्रदायांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते. प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी टीव्ही9शी बोलताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
पंढरपूर : ‘बिग बॉसच्या घरात संतांची शिकवण देण्याचा प्रयत्न केला, मात्र बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे वारकरी संप्रदायांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते. प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी टीव्ही9शी बोलताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. बिग बॉसच्या घरात कीर्तनकार शिवलीला पाटील यांची निवड झाल्यापासून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर होत्या. शिवलीला पाटील यांनी वैद्यकीय कारणातून बिग बॉसच्या घरातून माघार घेतली.
वारकरी संप्रदाय आणि ज्येष्ठ मंडळी नाराज होते. त्यांच्याशी बातचीत करूनच निर्णय घ्यायला पाहिजे होता, असं देखील त्या म्हणाल्या. बिग बॉसच्या घरात जाण्याचा माझा हेतू चांगला होता कीर्तनाच्या माध्यमातून आध्यात्मिक शिकवण देण्याचा विचार असल्याचे, शिवलीला पाटील यांनी सांगितले.
आपले विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला!
‘बिग बॉस; हा शो वारकरी संप्रदाय पाहत नाही, हे मलाही माहित आहे. मात्र ज्या प्रेक्षकांना वारकरी परंपरा माहिती नव्हता त्या प्रेक्षकांना कीर्तनाच्या माध्यमातून विचार परिवर्तन केले, असे शिवलीला पाटील म्हणाल्या. ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतर झालेल्या वादावर ही त्यांनी आपले मौन सोडले.
मी संस्कृती विसरले नाही, मग माझी चूक काय?
नुकतेच शिवलीला पाटील यांनी कीर्तन देखील केले. ‘बिग बॉस’मध्ये गेले ही चूक झालायचे कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी जाहीर कीर्तनात सांगितले. तर, शिवलीला ही शेतकऱ्याची मुलगी असून, फक्त एक मुलगी एक महिला कीर्तनकार असल्यानेच विरोध होत असल्याची टीका शिवलेला यांनी कीर्तनात बोलताना केली. तर, ‘बिग बॉस’मध्ये आपल्या धर्माची संस्कृती, आपला संप्रदाय, माझे कीर्तन, माझी तुळशीमाळ अख्ख्या महाराष्ट्राला दिसावी, म्हणून बिग बॉस मध्ये गेले असलयाचे कबुली देखील त्यांनी दिली आणि तिथं राहून वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविले असून, त्याठिकाणी अभंगावर बोलले, ज्ञानेश्वरी वाचन करणे तुळशीचे पूजन सोडले नाही. वारकरी संस्कृती जपूनच बिग बॉसच्या घरात राहिले असल्याची माहिती कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांनी आपल्या कीर्तनाच्या सुरुवातीला दिली. एव्हढेच नव्हे तर जिजाऊंची लेक असलयाने कोणालाही घाबरत नसल्याचा इशाराही शिवलेला पाटील यांनी दिला आहे.
चाहत्यांकडून झाली होती टीका
आपल्या कीर्तनाने श्रोत्यांचे कान तृप्त करणारी शिवलीलाचे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणे रुचलेले नाहीये. सोशल मीडियाद्वारे अनेक चाहत्यांनी कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शिवलीलाच्या एका श्रोत्याने कमेंट करत म्हंटले की, ‘ताई, मला वाटतं हा तुमचा निर्णय चुकीचा ठरेल.’ तर, दुसऱ्याने म्हटले की, ‘खर तर यांना बिग बॉसच्या घरात यायची गरज नव्हतीच. शिवलीलाताई तुम्ही कीर्तनकार आहात तुमची समाजाला गरज आहे बिग बॉसला नाही’. ‘त्या घरात काही अध्यात्मिक सत्वगुणी वातावरण नसतं. त्या घरात तमोगुणी वातावरण असतं. तिथं जेवणाचं काय..? मांस आणि अंडी त्याच किचन मध्ये बनतं जिथं शाकाहारी भोजन बनतं. आपण एका शुद्ध वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतोय याचं भान असू द्या. अध्यात्मिक पतन खूप महागात पडतं. ज्या प्रमाणे श्रीमद भागवत मध्ये महाराज नहूस यांचं पतन झालं तसं तुमचं पण अध्यात्मिक पतन होईल. नाहूस महाराज धर्मराज युधिष्ठिर महाराजांना व्यक्तीचे पतन होण्याची कारणे सांगतात. नाहूस महाराज म्हणतात “पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पैसा” या चार गोष्टी मुळे व्यक्तीचे पतन होते. अजून वेळ गेली नाही योग्य निर्णय घ्या.’, असे देखील एका चाहत्याने म्हटले होते.
हेही वाचा :
… म्हणून पहिल्या मुलाचं नाव आर्यन ठेवलं! शाहरुख खानने सांगितलं लेकाच्या नावामागचं कारण