Jeev Zala Yedapisa  | तब्बल 5 भाषांमध्ये अनुवाद, छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!

शिवा आणि सिद्धीची प्रेमकहाणी तसेच त्यांची जोडीही प्रेक्षकांना खूप भावली. मात्र, हा प्रवास आता संपतोय आणि ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

Jeev Zala Yedapisa  | तब्बल 5 भाषांमध्ये अनुवाद, छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!
जीव झाला येडा पिसा
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 2:01 PM

मुंबई : मालिका विश्वात सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर, काही जुन्या आणि लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. यात कलर्स मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘जीव झाला येडा पिसा’ (Jeev Zala Yedapisa) ही आज (3 एप्रिल) प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. त्यानिमित्ताने मालिकेचे लेखक आणि अभिनेते चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी खास पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चिन्मय मांडलेकर यांनी या मालिकेचे कथा लेखन केले आहे (Jeev Zala Yedapisa colors Marathi serial going off air writer Chinmay mandlekar share emotional post).

‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेच्या शीर्षक गीतापासून मालिकेतील कलाकारांच्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. शिवा आणि सिद्धीची प्रेमकहाणी तसेच त्यांची जोडीही प्रेक्षकांना खूप भावली. मात्र, हा प्रवास आता संपतोय आणि ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

काय म्हणाले चिन्मय मांडलेकर?

मालिका ऑफ एअर जात असल्याने लेखक-अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी खास पोस्ट लिहित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. शिवा आणि सिद्धीचा एक फोटो पोस्त करत ते लिहितात, ‘535 भागांचा टप्पा पूर्ण करुन जीव झाला येडापिसाचा प्रवास आज थांबतो आहे. माझ्य‍ा काळजाच्या खूप जवळची ही माझी मालिका. पुराशी, कोविडशी लढली. कले कलेनं वाढली. 5 भाषांमध्ये हीच्या आवृत्त्या निघाल्या. त्याही यशस्वी झाल्या. आज हा सगळा प्रवास ‍थांबेल. कधी थांबणार? पेक्षा का थांबलात? हा प्रश्न कधीही गोड वाटतो. सर्व कलाकार तंत्रज्ञांचं अभिनंदन आणि आभार. विनोद लव्हेकर, निखील शेठ, कल्याणी पाठारे, दीपा तेली, विशाल उपासनी, संग्राम दत्ता, तुषार जोशी, प्राची कदम तुम्ही जे दिलंत त्यासाठी भरपूर प्रेम आणि आभार. आणि मी तुम्हाला जो त्रास दिला त्याबद्दल क्षमा. खूप खूप आभार दीपक राज्याध्याक्ष तू दाखवलेल्या विश्वासाबद्दल. आणि मनापासून आभार शिवा,सिद्दी,जलवा,सोनी,आत्याबाई,सरकार आणि संपूर्ण रुद्रायतच्या जगावर प्रेम करणार्‍या रसिकांचे’(Jeev Zala Yedapisa colors Marathi serial going off air writer Chinmay mandlekar share emotional post)

पाहा चिन्मयची पोस्ट

शिवा-सिद्धी बनली प्रेक्षकांची लाडकी जोडी

‘जीव झाला येडा पिसा’ ही मालिका आता 535 भागांचा टप्पा पूर्ण करून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेतील शिवा आणि सिद्धीची जोडी प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली होती. अभिनेता अशोक फळदेसाई या मालिकेत शिवाची भूमिका साकारतो, तर अभिनेत्री विदुला चौगुले सिद्धीच्या भूमिकेत दिसली. या  कलाकारांना या मालिकेमुळे प्रेक्षकांचं भरपुर प्रेम मिळालं आणि त्यांचा मोठा चाहतावर्गही निर्माण झाला आहे.

(Jeev Zala Yedapisa colors Marathi serial going off air writer Chinmay mandlekar share emotional post)

हेही वाचा :

“अत्यंत घाण भाषेत आम्हीही रिअ‍ॅक्ट होऊ शकतो” प्रेक्षकाच्या अश्लाघ्य टीकेवर अभिनेता शशांक केतकर संतापला

Birthday Wishes | ‘तू माझं जग आहेस…’, पडद्यावरच्या ‘गुरुनाथ’ची खऱ्या आयुष्यातल्या ‘राधिका’साठी खास पोस्ट!

'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.