Kaun Banega Crorepati 16: बीग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा ‘ कौन बनेगा करोडपती’ च्या 16 व्या सीजनच्या माध्यमातून आले आहेत. 12 ऑगस्टपासून सुरु झालेल्या या शो मध्ये नेहमीप्रमाणे अमिताभ बच्चन होस्ट करत आहे. नुकताच शोच्या एका भागात आदिवासी स्पर्धक बंटी वडिया याने 50 लाख रुपये जिंकले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्याच्यासमोर एक कोटीची रक्कम असणारा प्रश्न ठेवला. परंतु तो त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. एक कोटी ऐवजी 50 लाख घेऊन तो घरी परतला. अमिताभ बच्चन यांनी एक कोटीसाठी कोणता प्रश्न ठेवला होता अन् त्याचे उत्तर काय आहे…
बंटी वडिवाने शो जिवनात आलेले अनेक कठीण प्रसंग शेअर केले. त्याने सांगितले की, तो मुंबईत आला तेव्हा त्यांच्याकडे फक्त 260 रूपये होते. परंतु आता केबीसीमुळे तो लखपती झाला आहे. आता जिंकलेल्या या रक्कमेतून तो आपल्या वडिलांचे कर्ज फेडणार आहे.
कौन बनेगा करोडपतीमध्ये बंटी वडिवा याच्यासमोर अमिताभ बच्चन यांनी आपल्या अंदाजात एक कोटी रुपयासाठी प्रश्न केला. बंटी 50 लाख रुपये जिंकला होता. तसेच त्याच्याजवळ कोणतीच लाइफलाइन नव्हती.
Baithhe hai Banti Vadiva hotseat par. Kya woh 1 Cr ke sawaal ka jawab de paayenge?
Amit ji ki baatein sab ke mann ko chhu jaati hai!
Dekhiye #KaunBanegaCrorepati, aaj raat 9 baje sirf #SonyEntertainmentTelevision par.#KBConSonyTV #KBC16 #KBCisback #KBC2024 #JawaabTohDenaHoga pic.twitter.com/T6aCQV2Eaz
— sonytv (@SonyTV) September 4, 2024
एक कोटींच्या प्रश्नावर बंटी वडिवाने खूप विचार केला. त्याचे मन वारंवार पर्याय A म्हणजेच पायथागोरस पुरस्काराकडे जात होते. मात्र, त्याला त्याच्या उत्तराची खात्री नव्हती आणि त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. बंटीने गेम सोडल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्याला उत्तर सांगितले. एक कोटीच्या प्रश्नाचे उत्तर पर्याय C म्हणजे ऑलिम्पिक पदक होते.
बंटीने गेम सोडल्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेते मनू भाकर आणि अमन सेहरावत कौन बनेगा करोडपती सीझन 16 मध्ये हॉटसीटवर आले. खेळादरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांना अनेक मनोरंजक प्रश्न विचारले.