मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. विशेष म्हणजे उर्फी जावेद देखील चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रतिउत्तर देताना दिसत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरुन तिच्यावर निशाना साधल थेट तिचे थोबाड रंगवण्याची भाषा केलीये. जिथे मिळेल तिथे तिचे थोबाड रंगवणार असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. इतकेच नाहीतर जेलमध्ये टाकण्याची भाषाही चित्रा वाघ यांनी केलीये. यावर उर्फीने चित्रा वाघ यांना म्हटले की, अवैध डान्सबार आणि बेकायदेशीर वेश्याव्यवसाय थांबवा अगोदर आणि मला कोणीही जेलमध्ये टाकू शकत नसल्याचे देखील तिने म्हटले आहे.
चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामधील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता या वादामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील महत्वाचे विधान केले असून मागणी केली तर उर्फी जावेद हिला संरक्षण देऊ असे त्यांनी म्हटले आहे.
चित्रा वाघ ज्या उर्फी जावेदला चोपण्याची भाषा करत आहेत, ती उर्फी जावेद नेमकी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, उर्फी जावेद तिच्या हटके आणि अतरंगी कपड्यांसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे चित्रा वाघ यांनी थेट उर्फी जावेद हिच्याविरोधात पोलिस ठाण्यामध्ये तक्रारही नोंदवली आहे.
बिग बाॅस ओटीटीपासून उर्फी जावेद ही चर्चेत आलीये. उर्फी ही मुळ उत्तर प्रदेशची आहे. उर्फी 25 वर्षाची असून तिच्या जन्म 15 ऑक्टोबर 1997 रोजी झाला आहे. अभिनयाची आवड असल्याने उर्फीने अगदी कमी वयामध्येच मुंबई गाठली होती.
उर्फी जावेद आणि तिच्या कुटुंबामध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे तिने सांगितले होते. काही गोष्टींमुळे तिचे घरच्यांसोबत चांगले रिलेशन नाहीये. अनेक मालिकांमध्ये उर्फी जावेद हिने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, खरी प्रसिध्द आणि ओळख तिला बिग बाॅस ओटीटीमुळेच मिळालीये.
उर्फी जावेद हिचे मास कम्युनिकेशन झाले असून तिला एक पत्रकार बनण्याची इच्छा होती. उर्फी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. उर्फी कसे कपडे घालेल याचा अजिबात नेम नाहीये. नुकताच उर्फीने शर्ट न घालता नाश्त्याची प्लेट हातामध्ये घेत एक व्हिडीओ तयार केला होता.
उर्फीला तिच्या हटके स्टाईलमुळे एक मोठी फॅन फाॅलोइंग नक्कीच मिळालीये. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे जीवे मारून बलात्कार करण्याच्या धमक्या देखील मिळतात. कपड्यांमुळे तिच्यावर टीका देखील केली जाते. आता तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट पोलिसात उर्फी जावेद विरोधात तक्रार नोंदवलीये.