जेव्हा मिश्रांची लेक भोसलेंच्या घरची सून होते, वाचा संकेत-सुगंधाच्या ‘प्यारवाली लव्हस्टोरी’बद्दल…

‘द कपिल शर्मा’ शो फेम अभिनेत्री सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) आणि कॉमेडीयन संकेत भोसले (Sanket Bhosle) ही जोडी विवाह बंधनात अडकली आहे. 2017ला सुरु झालेली ही लव्हस्टोरी अखेर एका नात्यात परावर्तीत झाली आहे.

जेव्हा मिश्रांची लेक भोसलेंच्या घरची सून होते, वाचा संकेत-सुगंधाच्या ‘प्यारवाली लव्हस्टोरी’बद्दल...
सुगंधा आणि संकेत भोसले
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 11:04 AM

मुंबई : ‘द कपिल शर्मा’ शो फेम अभिनेत्री सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) आणि कॉमेडीयन संकेत भोसले (Sanket Bhosle) ही जोडी विवाह बंधनात अडकली आहे. 2017ला सुरु झालेली ही लव्हस्टोरी अखेर एका नात्यात परावर्तीत झाली आहे. 17 एप्रिलला आपल्या साखरपुड्याची घोषणा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत म्हणता म्हणता त्यांनी आता एकेमकांशी कायमस्वरूपी नाते जोडले आहे. नुकत्याच एका मुलाखती दरम्यान त्यांनी आपली ही ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ चाहत्यांनसोबत शेअर केली (Know details about Comedian Sanket Bhosle and Sugandha Mishra cute love story).

अभिनेत्री सुगंधा मिश्रा ही एक बहु प्रतिभावान व्यक्तिमत्व आहे. ती सुप्रसिद्ध कॉमेडीयन असण्याबरोबरच एक प्रसिद्ध गायक आणि उत्तम होस्ट देखील आहे. ती कपिल शर्माच्या शोमध्ये बराच काळ दिसली होती, परंतु गेल्या वर्षी ती अचानक या शोमधून गायब झाली. दुसरीकडे संकेत भोसले देखील उत्तम कॉमेडीयन आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये तो अनेक सेलिब्रिटींची मिमिक्री करताना दिसला होता. त्याने केलेली अभिनेता संजय दत्तची मिमिक्री चाहत्यांना खूप आवडते. सुगंधा आणि संकेतच्या डेटिंगच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून समोर येत होत्या, पण आता या दोघांनीही आपल्या रसिकांना लग्नाची बातमी देऊन आनंदित केले आहे.

सुगंधा आणि संकेत यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती, ज्यात या कपलने आपल्या भेटीपासून लग्नापर्यंतच्या नियोजनावर बरेच काही सांगितले होते. सुगंधा म्हणाली की, त्यांच्या नात्यामागे मीडियाचाच हात आहे. सुगंधाने सांगितले, ‘जेव्हा आम्ही एकमेकांना डेटदेखील करीत नव्हतो, तेव्हा माध्यमांमधील आमच्या नात्याबद्दल बरेच लेख लिहिले गेले. मग आम्ही गेल्या वर्षी याचा गंभीरपणे विचार केला की खरंच ही गोष्ट सत्यात आली तर…’

कशी झाली भेट?

संकेत याच्याशी आपली भेट कशी झाली हे सांगताना सुगंधा म्हणाली, ‘7 वर्षांपूर्वी दुबईमध्ये कॉमेडी शोच्या शूटिंग दरम्यान आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. या दरम्यान आम्ही छान मित्र बनलो आणि नंतर आम्ही एकत्र काम करण्यास सुरुवात केली. हळूहळू कम्फर्ट लेव्हल वाढत गेली. म्हणून, जेव्हा आम्ही लग्नाबद्दल विचार केला, तेव्हा आम्ही ठरवले की आपले जीवन एकमेकांशी शेअर करण्यापेक्षा चांगले काहीच नाही. संकेत हा कौटुंबिक माणूस आहे, काळजी घेणारा, शहाणा आणि मोकळ्या विचारांचा व्यक्ती आहे.’ (Know details about Comedian Sanket Bhosle and Sugandha Mishra cute love story)

कसे जमले प्रेम?

सुगंधा आणि संकेत एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? या प्रश्नाचे मजेशीर पद्धतीने उत्तर देताना संकेत म्हणाला, ‘सुगंधाला इम्प्रेस करणे माझ्यासाठी एक मोठे आव्हान होते. तिचं मन जिंकणं ही सोपी गोष्ट नव्हती. सुगंधाचे कौतुक करताना संकेत म्हणाला, ‘ती माझ्यासाठी प्रेरक शक्ती आहे. मला समजले की त्याच्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. ती नि:स्वार्थी आहे आणि नेहमी लोकांना मदत करते. ती इतरांसाठी किती करते, हे मी पाहिले आहे. जेव्हा विनोदाचा विषय येतो तेव्हा आम्हा दोघांमध्ये खूप साम्य आहे. आमची हीच सवय आमच्या प्रेमाचा दुवा ठरली.’

मराठी कुटुंबात रमली मिश्रांची कन्या

सुगंधा मिश्रा (sugandha Mishra) आणि डॉ. संकेत भोसले (Sanket Bhosale) यांनी सोमवारी (27 एप्रिल) जालंधरमध्ये लग्न गाठ बांधली आहे. आता सासरी आल्यानंतर सुगंधाने महाराष्ट्रीयन होण्याची तयारी सुरू केली आहे. ती नवीन प्रथा शिकण्यात गुंतली आहे. लग्नानंतर पूजा सुगंधाच्या सासरच्या घरी ठेवली गेली, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे नवीन विवाहित जोडपे महाराष्ट्रीयन अवतारात दिसले आहे. सुगंधाने पारंपारिक नथ, नऊवारी साडी आणि केसांमध्ये छानसा गजरा घातला होता.

सुगंधा म्हणाली की, ती महाराष्ट्रीय गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि ‘बायको’ बनण्यासाठी खूप उत्साही आहे. सुगंधा म्हणाली की, तिने तिच्या पहिल्या ‘रसोई’त सासरच्यांसाठी पंजाबी मिठाई पंजिरी बनवली होती. हे एक पारंपारिक पंजाबी मिष्टान्न आहे, जे पूजेच्या वेळी बनवले जाते आणि प्रसाद म्हणून दिले जाते.

(Know details about Comedian Sanket Bhosle and Sugandha Mishra cute love story)

हेही वाचा :

TMKOC | …आणि पत्नी दयाबेनला ‘ए पागल औरत’ म्हणणं ‘जेठालाल’ला महागात पडलं! वाचा किस्सा…

PHOTO | नववधूचा साज तोंडावर मास्क, ‘लव लग्न लोच्या’मधील मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.