मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) हे गेल्या 41 दिवसांपासून दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. एम्समधील तज्ज्ञ डाॅक्टरांची टीम राजू यांच्यावर उपचार करते आहे. 41 दिवसांपासून राजू हे व्हेंटिलेटरवरच (Ventilator) आहेत. त्यांना अजून एक वेळही शुद्ध आली नाहीये. यामुळे कुटुंबीय चिंतेत आहेत. राजू श्रीवास्तव यांना शुद्ध येत नसल्याने डाॅक्टरांचे देखील टेन्शन (Tension) वाढले आहे. मध्यंतरी राजू यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याने डाॅक्टरांनी राजू यांच्या मुलीला आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती.
काही दिवसांपूर्वी डाॅक्टरांनी सांगितले होते की, राजू श्रीवास्तव यांना आतापर्यंत शुद्ध यायला हवी होती. मात्र 41 दिवस उलटूनही राजू यांना शुद्ध आली नाहीये. 10 आॅगस्ट रोजी राजू यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेंव्हापासून डाॅक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करते आहे. राजू यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही सर्वजण प्रार्थना करा, असे आवाहन राजू यांची मुलगी अंतरा हीने चाहत्यांना केले होते.
राजू यांची सध्या तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जातंय. मात्र, तब्येतीमध्ये सुधारणा जास्त होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. इतकेच नव्हे तर राजू यांना ताप देखील येतंय. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांच्या व्हेंटिलेटरचा पाईप बदलला, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा धोका होऊ नये. संसर्ग टाळण्यासाठी डाॅक्टरांनी राजू यांच्या पत्नीला आणि मुलीला देखील राजू यांना भेटण्यासाठी मनाई केलीये.