Video : वडील पहिल्यांदाच मुंबईत आल्याने ‘कोकण हार्डेट गर्ल’च्या डोळ्यात पाणी

Kokan Hearted Girl Family in Bigg Boss Marathi : 'कोकण हार्डेट गर्ल' चे कुटुंबीय 'बिग बॉस मराठी'च्या घरात आले आहेत. तिच्या दोन्ही लहान बहिणी आणि तिचे वडील 'बिग बॉस मराठी'च्या घरात आलेत. यावेळी 'कोकण हार्डेट गर्ल' भावूक झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. वाचा सविस्तर...

Video : वडील पहिल्यांदाच मुंबईत आल्याने 'कोकण हार्डेट गर्ल'च्या डोळ्यात पाणी
'कोकण हार्डेट गर्ल'च्या डोळ्यात पाणीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 1:54 PM

‘बिग बॉस मराठी’च्या घरात बहुप्रतिक्षीत ‘फॅमिली वीक’ टास्क सुरू झालेला आहे. ‘बिग बॉस मराठी’ मध्ये ‘फॅमिली वीक’ सुरू झाल्याचं पाहून प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता कुटुंबीय येऊन घरातील सदस्यांना काय सल्ला देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे. आजच्या भागात मुंबईत कधीही पाऊल न ठेवलेले अंकिताचे बाबा तिला भेटण्यासाठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आले आहेत. बाबांना ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात पाहून अंकिता भारावून जाते. हा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही या व्हीडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिताचे बाबा पहिल्यांदाच मुंबईत

‘बिग बॉस मराठी’ चा नवा प्रोमो सर्वांनाच भावूक करणारा आहे. या प्रोमोममध्ये अंकिताला भेटण्यासाठी तिचे कुटुंबिय ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आले आहेत. तिच्या दोन लहान बहिणी आलेल्या आहेत. बहिणींची भेट होत असतानाच ‘बिग बॉस’ तिला पुन्हा फ्रिज करतात आणि घरात तिच्या वडिलांची एन्ट्री होते. अचानकपणे बाबांना ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आलेलं पाहून अंकिता भावूक होते.

बाबांना गावी राहायलाच आवडतं. ते कधीच मुंबईत येत नाहीत, अशी सल अंकिताने अनेकदा बोलून दाखवली आहे. असं असतानाच आता बिग बॉस मराठीच्या घरात तिचे बाबा आलेत. पहिल्यांदाच ते मुंबईत आलेत हे पाहून अंकिताच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आहेत. आज बिग बॉस मराठीच्या घरात अंकिता आणि तिच्या बाबांचा अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळणार आहे.

मुंबईत कधीही पाऊल न ठेवलेले अंकिताचे बाबा आज पहिल्यांदाच आपल्या लाडक्या लेकीला भेटण्यासाठी मुंबईत आले आहेत. अंकितासाठी हा सुखद धक्का होता. प्रत्येक लेकीसाठी आपला बाबा हा खूप खास असतो. अंकितासाठीदेखील तिचा बाबा खूप स्पेशल असल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट दिसत आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

तिची ती ‘बाबा’ हाक डोळ्यात पाणी आणतेय. अंकिता तुझा सारखी मुलगी प्रत्येकाला मिळो… तुझे संस्कार बघून डोळ्यात पाणी येत गं… खूप प्रामाणिक खेळली. अशीच प्रामाणिक राहा आयुष्यात… देव सदैव तुझा पाठीशी आहे, अशी कमेंट एका प्रेक्षकाने या व्हीडिओवर केली आहे. अंकित सूरज दोघेही आपल्या मराठी संस्कृती जपतात साधी राहणी तुम्ही दोघेजण महाराष्ट्रातील जनतेच मन जिंकल., तुम्ही दोघे टॉप 2 मध्ये बघायला आवडेल, असं एका चाहत्याने म्हटलं आहे.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.