‘लाखात एक आमचा दादा’मध्ये दिसणार भावा बहिणींच्या प्रेमाची गोष्ट; मराठी मालिकेत पहिल्यांदाच…

Lakhat Ek Amcha Dada Serial : 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकाविश्वात पहिल्यांदाच 'लाखात एक आमचा दादा' चा पूर्वरंग भाग दाखवला जाणार आहे. काय आहे या मालिकेची गोष्ट प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार? वाचा सविस्तर...

'लाखात एक आमचा दादा'मध्ये दिसणार भावा बहिणींच्या प्रेमाची गोष्ट; मराठी मालिकेत पहिल्यांदाच...
नितीश चव्हाण, अभिनेताImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 5:39 PM

‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी टेलिव्हिजन पहिल्यांदाच भावा बहिणींच्या नात्यावर आधारित मालिका येत आहे. मालिकाविश्वात पहिल्यांदाच ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा पूर्वरंग भाग दाखवला जाणार आहे. आईची माया लावणारा, स्वभावाने निरागस, करारी मर्द, करड्या शिस्तीचा मात्र बहिणींच्या सुखासाठी, त्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांची लग्न उत्तमोत्तम घरात लागावीत, यासाठी दिवस रात्र जीवाचे रान करणारा ‘लाखात एक आमचा दादा’. मोठ्या दिलाचा राजामाणूस ‘सूर्यादादा’ 8 जुलैला रात्री साडे 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

‘लाखात एक आमचा दादा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दादा येतोय म्हटल्यावर सेलेब्रेशन ग्रँड असणारच… दादाचं आगमन झालं ते ढोल -ताश्याच्या गजरात…. नितीश चव्हाणने सूर्यदादाच्या भव्य 30 फूट प्रतिमेचं अनावरण त्याच्या लाडक्या बहिणींसोबत केलं आणि या ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार सातारकर झाले. या भव्य क्षणांचे तुम्हीही साक्षीदार बनणार आहात. हे खास क्षण 7 जुलैला रात्री ८.३० वा झी मराठीवर पाहायला मिळणार आहेत . अश्याप्रकारे कोणत्याही मालिकेचं भव्य पूर्वरंग होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.

मालिकेची गोष्ट काय?

बहिणींना आईच्या मायेनी वाढवणारा सूर्यादादा मालिका विश्वात पहिल्यांदाच येत आहे बहिणींच्या लग्नाची त्याला चिंता पण विधीच आहे काही वेगळंच विधान. दादाचं लग्न ठरवणार बहिणीचं भविष्य. पण सूर्याची लव्ह स्टोरी सोपी नाही. कारण त्याच्या प्रेमात जालिंदरचा अडथळा आहे. एकीकडे दुष्ट बाप आणि एकीकडे प्रेमळ सूर्यादादा. जालिंदरच्या दमदार भूमिकेत ज्ये ष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक दिसणार आहेत. या मालिकेत ते खलनायकाची भूमिका साकारत आहेत.

परिस्थितीने कितीही केली मात तरीही देवाची आहे दादाला साथ. या मालिकेच्या निमित्ताने लागीर झालं जीनंतर नितीश चव्हाण पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहे. तसेच दिशा परदेशी देखील या मालिकेच्या निमित्ताने मराठी मालिकाविश्वात नायिकेच्या भूमिकेत पदार्पण करतेय . या मालिकेचं लेखन केलंय स्वप्नील चव्हाण आणि विशाल कदम यांनी तर मालिकेचे दिग्दर्शक किरण दळवी आहेत. वज्र प्रोडक्शन या मालिकेची निर्मिती करणार आहेत.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.