Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नेटलेल्या गावात होतं ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचं शूटिंग

Lakhat Ek Amcha Dada Serial Shooting : मालिका म्हणजे मराठी प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय... मालिकांमध्ये घडत असलेल्या घटना, या मालिकांमधील पात्र प्रेक्षकांना जवळची वाटतात. अशीच एक मालिका म्हणजे 'लाखात एक आमचा दादा'... ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे.

अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नेटलेल्या गावात होतं 'लाखात एक आमचा दादा' मालिकेचं शूटिंग
'लाखात एक आमचा दादा' मालिकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 3:50 PM

झी मराठीवरील अनेक मालिकांचं पश्चिम महाराष्ट्रात शूटिंग होतं. सातारा वाई भागात सध्या अनेक मालिकांची शूटिंग सुरु आहेत. ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘पारू’ सारख्या मालिका साताऱ्यामध्ये शूट होतं आहेत. तसंच नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका वाईमध्ये शूट होतं आहे. वाईतील मयुरेश्वर गावात या मालिकेचं शूटिंग होत आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्य असणाऱ्या या गावात ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचं शूटिंग होत आहे. या मालिकेची तुळजा अर्थात अभिनेत्री दिशा परदेशीने शूटिंगचा अनुभव व्यक्त केला. यावेळी तिच्या शेड्युलबद्दलही तिने माहिती दिली.

नजर जाईल तिथंवर हिरवळ….

आम्ही सातारा, वाई भागात मालिकेचं शूट करतोय. वाईच्या आधी एक छोटंसं गाव पडत मयुरेश्वर तिथे आमचा सेट आहे. आमचा वाडा आहे आणि आम्ही कलाकार ही इथेच आसपास राहत आहोत. इथे शूट करण्याची खासियत म्हणजे हे ठिकाण खूप निसर्गरम्य आहे. जिथंपर्यंत नजर जाईल तिथं पर्यंत हिरवळच दिसतेय. त्यामुळे माझा पूर्ण दिवस एकदम सुखकारक जातो. इथे शहरासारखी रहदारी नाही, गाड्या कमी असल्यामुळे हँकिंगचं प्रमाण कमी आहे. याचमुळे मी तुळजाच पात्र खऱ्याअर्थाने जगत आहे, असं दिशा परदेशी म्हणाली.

साताऱ्यामध्ये ही प्रचंड पाऊस पडतोय. फरक इतकाच की इथे मुंबईसारखं पाणी तुंबत नाही. त्यामुळे शूटिंगमध्ये बाधा येत नाही आणि इथे पाऊसाची मनसोक्त मज्जा घेता येते. मुंबईमध्ये अवतीभवती मोठंमोठ्या इमारती दिसतात. पण इथे हिरवगार निसर्ग अनुभवायला मिळतो आणि पावसात इकडच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. माझा जन्म एका छोट्या शहरातला आहे. तिथेच माझं शालेय शिक्षण झालं आणि कॉलेज मुंबईतील रुईयामध्ये केलं. कामासाठी मी जगभर फिरते पण कधी गावात शूटिंग करायचा अनुभव नव्हता मिळाला. पण ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेमुळे मला ही संधी मिळाली, असं दिशा म्हणाली.

“ताज्या भाज्यांचं स्वादिष्ट जेवण अन्…”

मी खरंच सांगेन फार टेन्शन आलं होत मला ? पण इथे आल्यावर माझं आयुष्य सॉर्ट आऊट झालं आहे. कितीदा असे झाले आहे की आऊटडोर शूटिंग लागलाय आणि तिथे फोनच नेटवर्क नाही. हेच जर मी मुंबईत असताना झालं असतं. तर मी पॅनिक झाले असते. काम आणि मन दोन्ही प्रसन्नतेत सुरु आहे. शहरात ही गोष्ट कधीच अनुभवायला मिळाली नाही. इथेच एका घरात आम्ही जेवतो त्या मावशींची शेती आहे. त्या दररोज ताज्या भाज्या काढून आमच्यासाठी जेवण बनवतात. इतकं स्वादिष्ट जेवण मी आजपर्यंत कधीच खाल्लेलं नाही. एकदम ऑरगॅनिक आणि घरगुती जेवण मी शूटिंगवर खात आहे. अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे जितके मोर मी माझ्या पूर्ण आयुष्यात नसतील पाहिले तितके मी इथे या गावात पहिले आहेत, असंही दिशाने सांगितलं.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.