सरकार आणि सानिकाची पहिली भेट; नेटकरी म्हणाले, लय आवडता तुम्ही आम्हाला…

Lay Lay Awadtes Tu Mala Serial : '#लय आवडतेस तू मला' ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेने अल्पावधितच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत पहिल्यांदाच सरकार आणि सानिकाची भेट झाली आहे. या दोघांच्या पहिल्या भेटीनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

सरकार आणि सानिकाची पहिली भेट; नेटकरी म्हणाले, लय आवडता तुम्ही आम्हाला...
'#लय आवडतेस तू मला' मालिका रंजक वळणावरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 3:10 PM

गावाकडची गोष्ट अन् अलगद फुलणारं प्रेम… अशी एक नवी कथा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर नुकतीच ‘#लय आवडतेस तू मला’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. महाराष्ट्राच्या मातीतली रांगडी लव्हस्टोरी असणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. एका आठवड्यातच सरकार आणि सानिकाने संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली आहेत. पहिल्याच आठवड्यात मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. अनेक रंजक ट्विस्टमुळे चर्चेत असणाऱ्या या मालिकेत आता पहिल्यांदाच सरकार आणि सानिकाची भेट होणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे. यावर लय आवडता तुम्ही आम्हाला…, अशी कमेंट नेटकऱ्यांनी केलीय.

सरकार-सानिकाची पहिली भेट

‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेत या आठवड्यात सरकार आणि सानिकाची पहिली फिल्मी भेट झालेली पाहायला मिळणार आहे. या भेटीनंतर प्रेक्षकांना ‘सैराट’ची आठवण प्रेक्षकांना येणार आहे. तसंच वसू आणि विनय यांचा रोमँटिक अंदाज देखील प्रेक्षकांना आवडणार आहे. वसू आणि विनयच्या प्रेमाचा धागा म्हणजेच एक कडं आहे. पण आता हेच कडं सरकार-सानिकाची पहिली भेट घडवून आणणार आहे. सरकार आणि सानिकाची पहिली भेट कशी असेल? एकमेकांसमोर आल्यानंतर त्यांच्यातला संवाद कसा आणि काय असेल? याची उत्सुकता आहे. ‘#लय आवडतेस तू मला’ ही मालिका पहिल्याच आठवड्यात एका रंजक वळणावर आली आहे. एक अनोखी आणि उत्कंठावर्धक प्रेम कथा उलगडली जात आहे.

मालिकेला प्रेक्षकांची पसंती

सरकार आणि सानिका ही दोन भिन्न पात्र आहेत. या दोघांची पार्श्वभूमी वेगळी आहे. तरीही दोघांना जोडणारा एक धागा आहे. ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकेच्या कथानकाला गावरान बाज आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. या दोघांची जोडी, त्यांचा गावरान अंदाज प्रेक्षकांना आवडतो आहे.

‘#लय आवडतेस तू मला’ मालिकेत सानिका ही भूमिका साकारणारी अभिनेत्री सानिका मोजर हिने तिचा अनुभव सांगितला. तसंच तिने प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत. आमच्या जोडीला इतकं प्रेम दिल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे खूप-खूप आभार. या लव्हस्टोरीमध्ये अजून अनेक ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळणार आहेत. आमच्या दोघांची मैत्री- प्रेम आणि दोन गावांमधले मतभेद कसे सुटणार? हे सगळं मालिकेत बघायला मिळणार आहे, असं सानिका म्हणाली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.