‘भीमराया..’ हास्यजत्रा फेम गौरव मोरे याने का केली होती ती पोस्ट? उत्तर त्याने स्वतःच दिलंय!

'आमच्या श्वासावर तुमचे उपकार आहेत बाबा' असं म्हणणाऱ्या गौरव मोरे यांने सांगितलेला लंडनमधील खास किस्सा

'भीमराया..' हास्यजत्रा फेम गौरव मोरे याने का केली होती ती पोस्ट? उत्तर त्याने स्वतःच दिलंय!
गौरव मोरे, अभिनेताImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 5:09 PM

मुंबई : सोनी मराठीवरील प्रसिद्ध विनोदी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) आणि त्यातील कलाकार सगळ्यांनाच भुरळ पाडत आहेत. नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे (Gaurav More) यांने लंडनमध्ये असलेला शेअर केलेला एक फोटो आणि त्याची फेसबुक पोस्ट (Gaurav More Facebook Post) प्रचंड व्हायरल झाली. ही फेसबुक पोस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत होती. ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना’ या कवितेच्या काही ओळी गौरव मोरेने शेअर केल्या होत्या. या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून गौरव मोरे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं होतं. या फेसबुक पोस्टचं प्रचंड कौतुकही झालं होतं.

दरम्यान, ही फेसबुक पोस्ट करण्यामागचा किस्सा आणि लंडनमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जिथे राहिले होते, त्या ठिकाणाला भेट द्यावीशी त्याला का वाटलं होतं, हेही त्याने सांगितलंय.

काय होती गौरव मोरेची मूळ फेसबुक पोस्ट? पाहा :

हे सुद्धा वाचा

विनोदी अभिनेता गौरव मोरे याला लंडनमध्ये डॉ, बाबासाहेब आंबेडकर जिथे राहिले तिथे का जावंसं वाटलं, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने उत्तर देताना म्हटलं की…

बाबासाहेब भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आहेत. आपण लंडनला गेलो की लंडन ब्रिज, पॅलेस आपण पाहितो. बाबासाहेबांचा संघर्ष त्यांचं काम आपल्याला माहिती आहेच. पण ते जिथून शिकून गेले, ते ठिकाण पाहायला मिळणं ही एक पर्वणी आहे, असं मी मानतो.

एका सिनेमाच्या शूटिंगसाठी गौरव मोरे विनोदी अभिनेता भरत जाधव यांच्यासोबत लंडनला गेला होता. त्यावेळी त्याने आंबेडकर यांच्या लंडनमधील राहत्या घराला भेट दिली. पुढे त्याने म्हटलं की,…

आज समाजात गोरगरिबांना, अस्पृश्यांना जी संधी मिळाली आहे, ती त्यांच्यामुळे मिळालीय. माझ्यासारख्या मुलाला तिथे जाण्याची संधी मिळाली आहे, ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालेली आहे. जसे आपण आपल्या आईबाबांना विसरु शकत नाही, तसं आपण त्यांना विसरुन कसं चालेल? म्हणून मी तिथं गेलो. त्यांना वंदन केलं.

लंडनमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी गेल्यावर गौरव मोरे याच्या काय भावना होत्या, याही त्याने व्यक्त केल्या.

‘तिथं गेलगेल्या माझ्या अंगावर काटे आले होते. त्यांनी जो संघर्ष केलं, आपल्या सगळ्यांसाठी जे केलं, तेवढं करणं माझ्या हातात नाही. पण त्यांना वंदन करणं तर माझ्या हातात आहे. ते करण्यासाठी मी गेलो होतो. ते असतील किंवा आणखी कुणी महापुरुष असतील, आपण त्यांना वंदन केलं पाहिजे. म्हणूनच मी तिथे गेलो होतो.’

अशा शब्दात गौरव मोरे याने आपला अनुभव कथन केला. यानंतर त्यानं तिथं एक फोटो काढला. तो नंतर फेसबुकवरही त्याने शेअर केला होता. या फोटोवर हजारो लोकांनी रिएक्ट होत गौरव मोरेचं कौतुक केलं होतं.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.