स्टार प्रवाहची लवकरच नवी पौराणिक मालिका; महेश कोठारे यांची महत्वाची भूमिका

Star Pravah New Serial Ude G ambe... : स्टारप्रवाहवर वेगळ्या धाटणीच्या कथा पाहायला मिळतात. अशीच एक वेगळी गोष्ट असणारी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे करणार मालिकेची निर्मिती केली आहे. वाचा सविस्तर...

स्टार प्रवाहची लवकरच नवी पौराणिक मालिका; महेश कोठारे यांची महत्वाची भूमिका
उदे गं अंबे… मालिकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 7:28 PM

विठुमाऊली आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे नवी पौराणिक मालिका ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’. देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे.

नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार

‘उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड ही निर्मिती संस्था या भव्य मालिकेची निर्मिती करणार आहे. निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची या मालिकेचा मुहूर्त सोहळा पार पडला. यावेळी महेश कोठारे देखील सेटवर उपस्थित होते.

महेश कोठारे म्हणाले…

स्टार प्रवाहसोबत खूप जुने ऋणानुबंध आहेत. मन उधाण वाऱ्याचे ही पहिली मालिका स्टार प्रवाहसोबत केली होती. त्यानंतर विठुमाऊली, दख्खनचा राजा जोतिबा, पिंकीचा विजय असो, सुख म्हणजे नक्की काय असतं अश्या सुपरहिट मालिका केल्या, असं महेश कोठारे म्हणाले.

उदे गं अबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची या महामालिकेतून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा उलगडण्यात येणार आहे. ही मालिकाही भव्यदिव्य असेल यात शंका नाही. या भव्यदिव्य मालिकेतून कोणकोणते कलाकार भेटीला येणार? सेट कसा असेल? याविषयी प्रेक्षकांना लवकरच कळेल. या नव्या प्रोजेक्टसाठी प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळावेत हीच इच्छा व्यक्त करेन. नक्की पहा उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची लवकरच फक्त स्टार प्रवाहवर, असं महेश कोठारे यांनी नव्या मालिकेबद्दल म्हटलं आहे.

Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....