प्रसिद्ध मराठी अभिनेता पुन्हा एकदा विवाहबंधनात, ‘या’ खास व्यक्तीशी बांधली लग्नगाठ!

‘सुखांच्या सरींचे हे मन बावरे’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळ (Sangram Samel) यानेसुध्दा लग्नगाठ बांधली आहे. हे संग्रामचे दुसरे लग्न आहे. एका खासगी सोहळ्यात संग्राम लग्नाच्या बेडीत अडकला आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेता पुन्हा एकदा विवाहबंधनात, ‘या’ खास व्यक्तीशी बांधली लग्नगाठ!
संग्राम समेळ आणि श्रद्धा फाटक
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 12:07 PM

मुंबई : सध्या सर्वत्र लग्नसराईतल्या सनईचे सूर ऐकू येत आहेत. अनलॉकदरम्यान मनोरंजन विश्वातल्या अनेक जोड्या लग्नबंधनात अडकतायत. लॉकडाऊन दरम्यान पुढे ढकलण्यात आलेली लग्नं यंदा जोशात पार पाडली जातायत. अशातच कलाविश्वातही लगीनघाई पाहायला मिळते आहे. ‘सुखांच्या सरींचे हे मन बावरे’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळ (Sangram Samel) यानेसुध्दा लग्नगाठ बांधली आहे. हे संग्रामचे दुसरे लग्न आहे. एका खासगी सोहळ्यात संग्राम लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत (Marathi Actor Sangram Samel ties knot with choreographer shraddha phatak).

अभिनेता संग्राम समेळने श्रद्धा फाटक हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. श्रद्धा ही एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. संग्राम आणि श्रद्धाचा हा विवाह सोहळा काही खास नातेवाईक आणि कुटुंबाच्या उपस्थितीत इचलकरंजी याठिकाणी पार पडला. दोघांवरही चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संग्रामचे हे दुसरे लग्न आहे, याआधी संग्रामने 2016मध्ये ‘रुंजी’ फेम अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्याशी विवाह केला होता.

पाहा विवाहसोहळ्याचा फोटो :

View this post on Instagram

A post shared by Santosh Chakor (@imschakor)

(Marathi Actor Sangram Samel ties knot with choreographer shraddha phatak)

अभिनय क्षेत्रात रमलेला संग्राम

पल्लवी आणि संग्राम हे खूप वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांची मैत्री प्रेमात बदलली होती. आणि मग या दोघांनी लग्न केले होते. मात्र, हे नात फार काळ टिकले नाही. संग्रामचे आई-वडील अर्थात जेष्ठ अभिनेते अशोक समेळ आणि अभिनेत्री संजीवनी समेळ हे दोघेही मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. संग्रामने आपले शिक्षण वाणिज्य शाखेतून पूर्ण केले असले, तरी संग्रामला अभिनयाचा वारसा लहानपणापासून मिळाल्याने याच क्षेत्रात रमला आहे (Marathi Actor Sangram Samel ties knot with choreographer shraddha phatak).

‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील ‘समीर’ या व्यक्तीरेखेतून संग्राम तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. संग्रामने ‘ललित 205’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमधून तर ‘विकी वेलिंगकर’, ‘स्वीटी सातारकर’, ‘ब्रेव हार्ट’ (जिद्द जगण्याची) या चित्रपटांत काम केले आहे. त्याचबरोबर ‘एकच प्याला’ या नाटकामध्येही काम केले आहे.

मालिकेच्या वादामुळे संग्राम आलेला चर्चेत

‘सुखांच्या सरींचे हे मन बावरे’ या मालिकेच्या निर्मात्याने मानधन थकवल्या प्रकरणी या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर मोठी मोहीम उभी केली होती. या निमित्ताने त्यांनी कलाकाराच्या समस्यांना वाचा फोडली होती. यावेळी संग्राम समेळने देखील त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर आपले मत मांडले होते. यावेळी तो चर्चेत आला होता.

कोण आहे संग्रमची पहिली पत्नी?

‘रुंजी’ या मालिकेतून अभिनेत्री पल्लवी पाटील खूपच प्रसिद्ध झाली होती. पल्लवी आणि संग्राम हे खूप वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेम निर्माण झाली आणि मग या दोघांनी लग्न केले होते. मात्र, हे नात फार काळ टिकलं नाही. अनेक मालिका आणि नाटकांत या जोडीने एकत्र काम देखील केले होते.

(Marathi Actor Sangram Samel ties knot with choreographer shraddha phatak)

हेही वाचा :

आपल्याच मेहनतीचा पैसा भीक मागितल्यासारखा मागणं योग्य आहे का?, संग्राम समेळचा संतप्त सवाल…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.