‘होणार सून मी..’ आधी तब्बल तीन मालिका, बॉलिवूड डेब्यूमध्येच किसिंग सीन, लाडकी सून तेजश्री प्रधानचा प्रवास

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेने तिला 2013 मध्ये ओळख दिली असली, तरी तेजश्री त्याआधीपासूनच मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. (Tejashree Pradhan Aggabai Sunbai Bollywood Debut)

'होणार सून मी..' आधी तब्बल तीन मालिका, बॉलिवूड डेब्यूमध्येच किसिंग सीन, लाडकी सून तेजश्री प्रधानचा प्रवास
अभिनेत्री तेजश्री प्रधान
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 10:05 AM

मुंबई : ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील शुभ्राच्या व्यक्तिरेखेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. गेली दीड वर्ष तिने शुभ्राची भूमिका साकारली. ‘अग्गंबाई…’चं पुढचं पर्व ‘अग्गंबाई सूनबाई’ सुरु होण्याची कुणकुण लागली, आणि शुभ्रा बदलल्याचं चाहत्यांना कळलं. त्यामुळे अनेक जणांचा हिरमोड झाला. याआधी तेजश्रीने अनेक मालिका, नाटकं, चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. (Marathi Actress Tejashree Pradhan Aggabai Sunbai Honar Soon Me Hya Gharchi Bollywood Debut Kissing Scene with Sharman Joshi)

‘होणार सून…’ने लोकप्रियतेचं शिखर

झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ (Honar Soon Me Hya Gharchi) मालिकेतील जान्हवीच्या व्यक्तिरेखेने तेजश्री प्रधान लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. 2013 ते 2016 या साडेतीन वर्षांच्या कालावधीत श्री-जान्हवीच्या जोडीचं प्रेक्षकांवर गारुड होतं. तिचा ‘काहीही हं श्री’ हा डायलॉग तर अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सहा सासवांची लाडकी सून प्रेक्षकांना आपल्या घरची वाटू लागली. अगदी झी मराठी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट नायिका, सून, जोडी अशा सर्वच महत्त्वाच्या पुरस्कारांवर सलग तीन वर्ष तिने नाव कोरलं.

‘ह्या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून पदार्पण

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने तिला 2013 मध्ये ओळख दिली असली, तरी तेजश्री त्याआधीपासूनच मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. 2007 मध्ये त्यावेळच्या ईटीव्ही मराठी वाहिनीवर ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेने कमालीची लोकप्रियता मिळवली होती. तेजश्री या मालिकेचा भाग होती. आनंद अभ्यंकर, गिरीश ओक, वंदना गुप्ते, सई ताम्हणकर, प्रदीप वेलणकर अशा एकापेक्षा एक कलाकारांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली.

रमेश देव यांच्यासह अभिनय

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझं नि माझं घर श्रीमंताचं’ या मालिकेत तेजश्रीला अदितीची भूमिका मिळाली. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, विद्याधर जोशी, अविनाश नारकर, तेजस्विनी पंडित यासारख्या दिग्गजांसोबत ती झळकली.

‘होणार सून…’ आधी ‘लेक लाडकी या घरची’

2007 मध्ये तेजश्रीला मोठा ब्रेक मिळाला तो ‘लेक लाडकी या घरची’ मालिकेतून. लक्ष्मीची मुख्य व्यक्तिरेखा साकारण्याची संधी तिला मिळाली. या मालिकेत संपदा जोगळेकर, दीपक देऊळगावकर, शुभा खोटे, रिमा, सुलभा देशपांडे, राणी गुणाजी, शुभांगी लाटकर, आशुतोष कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, गिरीश परदेशी अशी एकापेक्षा एक कलाकारांची फौज होती. नावांची गंमत म्हणजे तिच्या आधीच्या मालिकेचं नाव ‘लेक लाडकी या घरची’ तर पुढच्या मालिकेचं नाव ‘होणार सून मी ह्या घरची’ हे जुन्या मराठी गाण्यातलंच.

झेंडा ते लग्न पहावे करुन

‘होणार सून’च्या लोकप्रियतेनंतर 2009 मध्ये तेजश्रीला अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘झेंडा’ हा चित्रपट मिळाला आणि तिने सिनेविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर शर्यत, लग्न पहावे करुन, असेही एकदा व्हावे असे अनेक चित्रपट तिने केले. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ सिनेमात तरुण मंदाकिनी आमटेंची भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाने तेजश्रीच्या लोकप्रियतेला नवीन आयाम मिळाला. ‘सूर नवा ध्यास नवा’ या सिंगिंग रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाचं तेजश्रीने उत्तम सूत्रसंचालन केलं. (Marathi Actress Tejashree Pradhan Aggabai Sunbai Honar Soon Me Hya Gharchi Bollywood Debut Kissing Scene with Sharman Joshi)

… म्हणून सोडली मालिका!

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला अग्गंबाई सासूबाई मालिकेतून एवढी प्रसिद्धी मिळत असूनही, तिने ही मालिका का सोडली असावी? अशी शंका चाहत्यांच्या मनात आहे. शेवटी सगळ्यांना आयुष्यात पुढे जायचे असते, वेगळी वेगळी ध्येय पूर्ण करायची असतात. तसेच काहीसे तेजश्री बरोबर झाले आहे. तेजश्री आता लवकरच बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अभिनेता शर्मन जोशी सोबतचा तिचा ‘बबलू बॅचलर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

बॉलिवूड पदार्पणात शर्मनसोबत किसिंग सीन

तेजश्री प्रधान बबलू बॅचलर या बॉलिवूड पदार्पणाबाबत कायमच उत्सुक होती. लॉकडाऊनमुळे सिनेमाचं रिलीज काहीसं रखडलं. पहिल्याच हिंदी चित्रपटात शर्मन जोशी मुख्य अभिनेता. विशेष म्हणजे या चित्रपटात तेजश्रीचा शर्मनसोबत किसिंग सीनही आहे. छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी तेजश्री आता बॉलिवूडही गाजवेल, यात शंका नाही.

पाहा ट्रेलर

संबंधित बातम्या :

प्रेक्षकांना येतेय जुन्या ‘शुभ्रा’ची आठवण, ‘या’ कारणामुळे तेजश्रीने मालिकेला म्हटला गुडबाय!

स्वीटू-शकू-आसावरीला पुरस्कार, ‘देवमाणूस’ बेस्ट खलनायक, झी मराठी अवॉर्ड विजेत्यांची यादी

(Marathi Actress Tejashree Pradhan Aggabai Sunbai Honar Soon Me Hya Gharchi Bollywood Debut Kissing Scene with Sharman Joshi)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.