Birthday Wishes | ‘तू माझं जग आहेस…’, पडद्यावरच्या ‘गुरुनाथ’ची खऱ्या आयुष्यातल्या ‘राधिका’साठी खास पोस्ट!

छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध मालिकेतील लोकप्रिय चेहरा अर्थात अभिनेता अभिजीत खांडकेकरने (Abhijeet Khandkekar) पत्नी सुखद खांडकेकरला अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Birthday Wishes | ‘तू माझं जग आहेस...’, पडद्यावरच्या ‘गुरुनाथ’ची खऱ्या आयुष्यातल्या ‘राधिका’साठी खास पोस्ट!
अभिजित आणि सुखदा खांडकेकर
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 4:01 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध मालिकेतील लोकप्रिय चेहरा अर्थात अभिनेता अभिजीत खांडकेकरने (Abhijeet Khandkekar) पत्नी सुखद खांडकेकरला अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी अभिजीत काम करत असलेली, लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya navryachi bayko) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. दीर्घकाळ ही मालिका प्रेक्षकांच मनोरंजन करत होती. यातील अभिजीतचे ‘गुरूनाथ’ हे पात्र विशेष गाजले होत. पडद्यावर तीन बायका, फजिती ऐका अशी गत झालेला गुरुनाथ खऱ्या आयुष्यात मात्र अतिशय ‘पत्नीव्रता’ असल्याचे त्याच्या या पोस्टमधून दिसून येत आहे (Mazhya navryachi bayko fame actor Abhijeet Khandkekar instagram post for Wife Sukhada).

अभिनेता अभिजीत खांडकेकरने पत्नी-अभिनेत्री सुखदा खांडकेकरला खास पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. ‘तू माझं जग आहेस… वाढदिवसाचा खूप शुभेच्छा’, असे छानसे कॅप्शन देत त्याने सुखदाबरोबरचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पाहा अभिजीतची पोस्ट :

अभिजीत आणि सुखदाची ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’

अभिजीतच्या पत्नीचं नाव सुखदा खांडकेकर असं असून तीदेखील अभिजीतप्रमाणेच उत्तम अभिनेत्री आहे.अभिजीत आणि सुखदा यांचं लव्ह मॅरेज आहे. एका कॉमन फ्रेंडमुळे या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात अन् पुढे लग्नात झालं (Mazhya navryachi bayko fame actor Abhijeet Khandkekar instagram post for Wife Sukhada).

सुखदाची कारकीर्द

सुखदाने काही मालिका, नाटक आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उत्तम अभिनय आणि सौंदर्य यामुळे सुखदाचे अनेक चाहते आहेत. ‘देवदास’, ‘कनुप्रिया’, ‘डूबधान’, ‘धारा की कहानी’ आणि ‘उमराव’ अशा हिंदी नाटकांमध्येही तिनं काम कंल आहे. तिचं ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ हे नाटक विशेष गाजलं. ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटातदेखील तिने छोटेखानी भूमिका साकारली आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती उत्तम नृत्यांगना आहे. तिने कथ्थक या नृत्यप्रकाराचं प्रशिक्षण घेतलं आहे.

अभिजीतची कारकीर्द

अभिजीत अभिनयाव्यतिरिक्त एक आरजे देखील आहे. रेडीयो जॉकी म्हणूनच त्याने आपल्या करिअरला सुरूवात केली होती. अनेक पुरस्कार सोहळ्यांत त्याने सूत्रसंचालन देखील केलं आहे. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रियॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून दिसला होता. 2010 साली ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ (Maziya priyala preet kalena) या मालिकेतून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. अभिजीत आणि अभिनेत्री मृणाल दुसानीस यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. त्यानंतर अभिजीत ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत दिसला होता. अनिता दाते- केळकर, रसिका सुनिल आणि अभिजीत खांडकेकर हे या मालिकेत मुख्य कलाकार होते.

(Mazhya navryachi bayko fame actor Abhijeet Khandkekar instagram post for Wife Sukhada)

हेही वाचा :

Video | Indian Idol 12च्या मंचावर रेखाला आली अमिताभ बच्चनची आठवण, ‘मुकद्दर’च्या गाण्यावर केली बिग बींची नक्कल!

Photo : ‘फुलराणी… अविस्मरणीय प्रेमकहाणी’,चित्रपटाच्या माध्यमातून दरवळणार प्रेमाचा नवा सुगंध

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.