Sharvani Pillai | अभिनेत्री शर्वाणी पिल्लईची नवी इनिंग, ‘माऊची लाडकी आई करणार नव्या क्षेत्रात पदार्पण!

विविध मालिका तसेच विविध नाटक, चित्रपट अशा तीनही माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री लेखिका शर्वाणी पिल्लई (Actress Sharvani Pillai) आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Sharvani Pillai | अभिनेत्री शर्वाणी पिल्लईची नवी इनिंग, ‘माऊची लाडकी आई करणार नव्या क्षेत्रात पदार्पण!
शर्वाणी पिल्लई
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 12:14 PM

मुंबई : ‘अवंतिका’ मालिकेतील सानिका असो, ‘आंबट गोड’ मधली इंदू असो, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील आदरणीय ‘सकवारबाई’ असो, अगदी सध्या चालू असलेल्या ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील उमा असो अशा विविध मालिका तसेच विविध नाटक, चित्रपट अशा तीनही माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री लेखिका शर्वाणी पिल्लई (Actress Sharvani Pillai) आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. पॅलेट मोशन पिक्चर्स असे तिच्या निर्मिती संस्थेचे नाव असून, शर्वाणी पिल्लई आणि लेखक, दिग्दर्शक सुश्रुत भागवत हे या निर्मिती संस्थेचे निर्माते असणार आहेत (Mulgi zali ho fame Actress Sharvani Pillai debuting in production field).

“वर्दे आणि सन्स” या आगामी लोकेश गुप्ते दिग्दर्शित वेब सीरिजची निर्मिती पॅलेट मोशन पिक्चर्स करत असून अभिजित खांडकेकर, उपेंद्र लिमये, रेशम श्रीवर्धन, दीपक करंजीकर अशी दमदार कलाकार मंडळी या वेबसीरीजच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहेत

लेखन क्षेत्रातही कमावले नाव!

नव्या इनिंग विषयी सांगताना ‘शर्वरी’ म्हणतात,’2014 साली प्रदर्शित झालेला ‘सौ शशी देवधर’ हा मी आणि सुश्रुत भागवत यांनी एकत्र लिहिलेला पहिला चित्रपट. पुढे आम्ही दोघांनी एकत्र येऊन व. पु. काळे लिखित ‘बदली’ या कथेचा विस्तार केला आणि सुश्रुतने दिग्दर्शक म्हणून पहिलं पाऊल उचललं. ‘अ पेइंग घोस्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला. त्यानंतर एका नव्या विषयाची जुळणी चालू झाली.

मधुकर रहाणे आणि रवी शिंगणे यांनी निर्मिती केलेला, “असेही एकदा व्हावे” प्रेक्षकांनी तर उचलून धरलाच पण त्याच बरोबरीने या चित्रपटासाठी राज्य पुरस्कार सोहळ्यात सात नामांकन आणि दोन पुरस्कार मिळाले. एक वेगळा विषय हाताळण्याची संधी निर्माते सुधीर कोलते यांनी देऊ केली ती ‘8 दोन 75, फक्त इच्छाशक्ती हवी!’ या चित्रपटाच्या निमित्ताने. सध्या या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन चालू असून आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.’ (Mulgi zali ho fame Actress Sharvani Pillai debuting in production field)

निर्मिती क्षेत्रात पदार्पण

निर्मिती क्षेत्रात आजवर प्रत्येक निर्मात्याने वैयक्तिक पातळीवर मालिका, चित्रपट, नाट्य निर्मिती करत उत्तमोत्तम कलाकृती रासिकांसमोर आणल्या आहेत. सुश्रुत आणि अभिनेत्री-लेखिका शर्वाणी पिल्लई यांनी जाहिरात क्षेत्रात पॅलेट मोशन पिक्चर्स या निर्मितीसंस्थेमार्फत जाहिरातींची निर्मिती केली आहे. चित्रपट निर्मिती करताना पोस्ट प्रोडक्शन ही एक अत्यंत महत्वाची जबाबदारी त्यांनी आजवर पेलली आहे. चित्रपटसृष्टीत आजवर जाहीरपणे “आपलं सिंडिकेशन आहे”, हे सांगितलं गेल्याची उदाहरण मोजकीच असतील, किंबहुना नसतीलही.

मेगाप्रोजेक्ट करण्याची ताकद मराठी इंडस्ट्रीत निर्माण करणं व त्यासाठी मल्टीरीसोर्सैस एकत्र आणणं या विचारातुन सुश्रुत भागवत, शर्वाणी पिल्लई, संतोष गुजराथी, मनोज पाटील व सुधीर कोलते, विकास हांडे यांनी एकत्र येऊन या सींडीकेशनची कल्पना पुढे आणली आणि ती प्रत्यक्षात उतरवलीदेखील!

रसिक प्रेक्षकांनी आजवर जसं प्रेम आमच्यावर, आमच्या कामावर केलं, तसं ते या पुढे सुद्धा नक्की राहील, या विश्वासावर आमचा हा एक छोटासा प्रयत्न, एक छोटं पाऊल, एक नवा प्रवास! असे अभिनेत्री लेखिका शर्वाणी पिल्लई आणि लेखक, दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी म्हटले आहे.

(Mulgi zali ho fame Actress Sharvani Pillai debuting in production field)

हेही वाचा :

Video | वर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवलं कतरिना कैफचं गाणं, व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल हसू…

Bappi Lahiri | कोरोनावर यशस्वी मात, बप्पी लहरींना मिळाला डिस्चार्ज! पोस्ट करत म्हणाले…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.