कपिल शर्माची फसवणूक; थेट ईडीचं कार्यालय गाठलं अन् तक्रार केली; म्हणाला…

Comedian Kapil Sharma in ED office : ईडीच्या कार्यालयात जात कॉमेडियन कपिल शर्माने तक्रार दाखल केली आहे. माझी घोर फसवणूक झाली आहे, असं म्हणत कपिल शर्माने जजाब दिला आहे. कपिलने कुणाविरोधात तक्रार केली आहे? तक्रारीत कपिल शर्मा नेमकं काय म्हणाला? वाचा सविस्तर...

कपिल शर्माची फसवणूक; थेट ईडीचं कार्यालय गाठलं अन् तक्रार केली; म्हणाला...
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 1:49 PM

मुंबई | 08 फेब्रुवारी 2024 : कॉमेडियन कपिल शर्मा हा वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून तो लोकांना खळखळून हसवतो. पण आता कपिल शर्मा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. कपिल शर्माची फसवणूक झाली आहे. या फसवणुकीविरोधात कपिल शर्मा थेट ईडीच्या कार्यालयात पोहोचला आहे. तिथे जात कपिलने तक्रार दाखल केली आहे. कार डिझायनर दिलीप छाबडिया यांच्या विरोधात कपिलने तक्रार केली आहे. दिलीप छाबडिया यांनी दिलेल्या वेळेत आपली व्हॅनिटी व्हॅन दिली नाही, असं कपिलचं म्हणणं आहे. दिलीप छाबडिया यांच्या विरोधात कपिल शर्माने फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

नेमकं काय घडलं?

कार डिझायनर दिलीप छाबडिया यांच्याकडून कपिल शर्माला एक व्हॅनिटी व्हॅन तयार करून घ्यायची होती. तसं या दोघांमध्ये बोलणं झालं. पण आता छाबडिया यांच्याकडून व्हॅनिटी मिळत नसल्याची कपिलची तक्रार आहे. छाबडिया यांच्या विरोधात कपिलने चार्टशीट दाखल केली आहे. ईडीचे अधिकारी मोहम्मद हामिद यांच्याकडे कपीलने आपला जबाब नोंदवला आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने काल (बुधवार) आरोपपत्राची दखल घेतली. त्यानुसार दिलीप छाबडिया यांच्यासोबत इतर सहा आरोपींना समन्स बजावलं आहे. 26 फेब्रुवारीला या सगळ्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कपिल शर्माचं म्हणणं काय आहे?

कॉमेडियन कपिल शर्माची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी थेट ईडी कार्यालयात जात कपिलने तक्रार दाखल केली आहे. छाबडिया यांनी व्हॅनिटीची डिलीवरी दिली नाही. शिवाय या दिरंगाईला मलाच जबाबदार आहे, असं छाबडिया यांचं म्हणणं आहे. शिवाय दिलीप छाबडिया यांनी माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, असं कपिल शर्मा याचं म्हणणं आहे.

व्हॅनिटी व्हॅन बनवण्यासाठी 2016 ला मी दिलीप छाबडिया यांच्याशी संपर्क केला. 2017 ला K9 प्रॉडक्शन आणि दिलीप छाबडिया डिझाइन प्रायव्हेट लिमिटेड (DCDPL) यांच्यात व्हॅनिटी व्हॅनसाठी 4.5 कोटींचा करार झाला. कपिल शर्माकडून दिलीप छाबडिया यांना 5. 31 कोटी रुपये देण्यात आले. मात्र ना ही कार मिळाली. ना ही पैसे परत मिळाले, अशी तक्रार कपिलने ईडीकडे केली आहे.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.