‘लाखात एक आमचा दादा’ निर्णायक वळणावर; तुळजाचा ‘तो’ निर्णय मालिकेला देणार नवं वळण

Lakhat Ek Amcha Dada Serial Update : 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका सध्या चर्चेत आहे. ही मालिका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. तुळजा एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता तिच्या या निर्णयाला सूर्या साथ देणार का? हे पाहावं लागणार आहे. वाचा सविस्तर...

'लाखात एक आमचा दादा' निर्णायक वळणावर; तुळजाचा 'तो' निर्णय मालिकेला देणार नवं वळण
'लाखात एक आमचा दादा' निर्णायक वळणावरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 4:28 PM

‘लाखात एक आमचा दादा’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. कलाकारांचे दमदार अभिनय आणि कथानक हे या मालिकेचं वेगळेपण ठरलं आहे. सध्या मालिकेत एक नाही तर दोन लग्नांची लगबग सुरु आहे. दादाच्या घरी मोठी बहीण तेजू हिचा साखरपुडा ठरला आहे. साखरपुड्यासाठी घरात जोरदार तयारी सुरु आहे सगळे उत्साहात आहेत. त्यामुळे सूर्या दादाचा आनंद गगनात मावत नाहीये. पण अशातच आता ही मालिका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. तुळजाचा एक निर्णय मालिकेला नवं वळण देणारा ठरणार आहे.

नव्या प्रोमोत काय?

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यात तुळजा सूर्याला सांगते की तू माझं लग्न मोड आणि त्यानुसार सूर्या एक प्लॅन तयार करतो. सूर्या पायरीवर दूध टाकतो त्यामुळे सत्यजित पडतो आणि त्याची मान मोडते. यामुळे घरात एकच गोंधळ होतो. आता तुळजाच्या या निर्णयामुळे मालिका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे.

सूर्याच्या बहिणीच्या लग्नाची तयारी पाहून जालिंदरला स्वतःच्या मनाशी गाठ बांधतो की तेजश्रीच्या लग्नाआधी आपल्या घरात तुळजाचं लग्न धूमधडाक्यात व्हायला हवं. तुळजाचा भाऊ शत्रुघ्न लोकांना गुंतवून ठेवतो आणि तेजूच्या लग्नात विघ्न आण्यासाठी गोंधळ घालतो. ज्यामुळे सूर्या दादाची आई पळून गेली आहे. यावर चर्चा रंगते आणि तेजूचं लग्न मोडतं.

तुळजा सूर्याला सांगणार मनातली गोष्ट

सूर्यादादाच्या घरात जेव्हा हे कळतं तेव्हा संपूर्ण घर उध्वस्त होतं. जालिंदरच्या कानावर ही बातमी पोहचते. दादाने सर्वांना या दु:खातून बाहेर काढायचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे गावात जत्रा आयोजित केली गेली आहे. त्या जत्रेत तुळजा सूर्याला सांगते की तिला सत्यजितशी लग्न करायचं नाहीये आणि म्हणूनच ती ज्या जत्रेला जात आहे. तिथे तिला सूर्याची सोबत हवी आहे. हे ऐकून सूर्याने तुळजाला जत्रेला घेऊन जायचे ठरवलं आहे. तुळजा तिच्या मनातलं सूर्यासमोर सांगू शकेल? यामुळे सूर्याच्या स्वप्नाला नवीन पंख मिळतील? सत्यजितशी लग्न न करायचा निर्णयामुळे काय असेल जालिंदरचा पुढचा डाव? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा पुढचा भाग पाहावा लागणार आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.