कसा आहे निलेश साबळेचा नवा शो?; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ची पहिली झलक
Nilesh Sable Hastay Na Hasayalach Pahije First Promo : कलर्स मराठी वाहिनीवर एक नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' निलेश साबळेच्या या कॉमेडी शोचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. कसा आहे हा कार्यक्रम? वाचा सविस्तर...
‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमानंतर डॉ. निलेश साबळे नवाकोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे’ हा कार्यक्रम 27 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील काही दिवसांपासून या नवीन शोचे बरेच व्हीडिओ आणि चर्चा आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तेव्हापासूनच या शोची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. हा कार्यक्रम नक्की कसा असेल? याबाबत चर्चा होऊ लागली होती. अशातच आता या शोचा आणखी एक प्रोमो समोर आलाय. या प्रोमोमध्ये शोच्या पहिल्या एपिसोडची झलक पाहायला मिळत आहे.
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ची पहिली झलक
अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा त्याचा नवीन शो ‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे’ हा शो घेऊन आला आहे. या नवीन प्रोमोत ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची संपूर्ण टीम पोट धरून हसताना दिसत आहे. यासोबत अभिनेते भरत जाधव आणि अलका कुबल या देखील ओंकार आणि भाऊ यांच्या विनोदावर हसत आहेत. या स्किटमध्ये हे दोघे ही स्त्रियांचे पात्र साकारत आपल्याला दिसयेत.
View this post on Instagram
कोण-कोण कलाकार असणार?
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोचं लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे करत आहे. तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीरांसोबत हा नवाकोरा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेत्री सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकारदेखील या कार्यक्रमात दिसणार आहेत. येत्या 27 एप्रिलतारखेपासून शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमानंतर निलेशसाबळे याने नवा कार्यक्रम सुरु केला आहे. ‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे’ हा कार्यक्रम 27 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा कार्यक्रम कसा असेल? याची झलक दाखवणारा प्रोमो रिलीज झाला आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’च्या या नवीन प्रोमोला प्रेक्षकांनी प्रचंड लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.