हास्याची मेजवानी… ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’चं शीर्षकगीत पाहिलंत का?
Actor Nilesh Sable Hastay na Hasaylach Pahije Show New Promo : 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या रिअॅलिटी शोचं शीर्षकगीत रिलीज झालं आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमाची झलक शीर्षक गीतातून दिसत आहे.
अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक अशी ओळख असलेला डॉ. निलेश साबळे हा मागच्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडणारा निलेश साबळे नवाकोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे’ हा कार्यक्रम कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमाचं शीर्षकगीत समोर आलं आहे. या कार्यक्रमाचा थोडक्यात सार सांगणारं हे शीर्षकगीत आहे. या कार्यक्रमाचा नवा टीझरही रिलीज झाला आहे. निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे त्रिकुट प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे.
‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे’चा टिझर
‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे’ या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली होती. शोचे प्रोमो, टिझर आणि शीर्षक गीत रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर चांगलीच याबद्दल चर्चा सुरू होती. नुकतंच या शोच्या प्रोमोचा बीटीएस व्हीडीओ पोस्ट करण्यात आला आहे. रसिकांनी या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. या व्हीडिओवर कंमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे’ चा हा प्रोमो शूट करतानाची मज्जा, मस्ती आणि धमाल तुम्ही यात पाहू शकता. हा व्हीडीओ तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडेल. या व्हीडीओत तुम्ही निलेश साबळे , भाऊ कदम, ओंकार भोजने आणि सुपर्णा श्याम यांना हे दिसत आहेत. त्याचबरोबर कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे देखील या प्रोमो शूटच्या वेळी हजर होते.
View this post on Instagram
हास्याची मेजवानी
‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची संपूर्ण टीम पोट धरून हसत होती. यासोबत अभिनेते भरत जाधव आणि अलका कुबल हे देखील भाऊ आणि ओंकारच्या स्किटवर हसताना दिसत आहेत. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोचं लेखन आणि दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे करतोय. तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीरांसोहतच अभिनेत्री सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकारही या कार्यक्रमात आहेत.