आता कुठे अक्षरा- अधिपतीचं नातं फुलत होतं…; पण भुवनेश्वरी आणणार नवं वितुष्ट?
Tula Shikvin Changlach Dhada Serial New Twist : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिका रोमॅन्टिक ट्रॅकवर असताना आता भुवनेश्वरी नवा रचत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. मालिकेत नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर....
झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत आता रोमॅन्टिक ट्रॅक सुरु आहे. अथक प्रयत्नांनंतर नुकतंच अक्षराने अधिपतीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अधिपतीच्या रांगड्या स्टाईलमध्ये अक्षराने प्रमोज केलंय. यामुळे अधिपतीदेखील भारावून गेला आहे. अशात आता रोमॅन्टिक ट्रॅक पाहायला मिळेल, अशी प्रेक्षकांची अपेक्षा असतानाच आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. भुवनेश्वरी सध्या नवा कट रचताना पाहायला मिळतेय. त्यामुळे अक्षरा- अधिपतीचं नात फुलत असतानाच भुवनेश्वरी वितुष्ट आणणार का? अशी चर्चा होतेय.
काय असेल भुवनेश्वरीचा कट?
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे. मालिकेला ही प्रेक्षकांचं तितकंच प्रेम मिळत आहे. अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली अधिपतीला दिली आहे. प्रेमाची कबुली दिल्यावर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसत आहे.
अक्षरा आणि अधिपतीचा खरा संसार आता कुठे सुरु झालाय. त्यांच्या नात्याला अजून घट्ट करण्यासाठी आजी ठरवते की त्यांच्यासाठी काहीतरी करायचे. अधिपती-अक्षराची खोली सजवण्याची तयारी आजी सुरु करते. ही गोष्ट जेव्हा भुवनेश्वरीला कळते तिचा संताप होतो. भुवनेश्वरी त्यांना वेगळं करण्याचा नवा कट रचतेय. भुवनेश्वरी मुद्दाम दुर्गेश्वरीला त्यांची खोली जातीने लक्ष घालून सजवण्याचा आदेश देते. काय आहे भुवनेश्वरीची नवीन प्लान? अक्षरा अधिपतीमध्ये होईल का एका नव्या नात्याची सुरुवात? याची सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चा होतेय.
अक्षराने दिली प्रेमाची कबुली…
अधिपती आणि अक्षरा यांचं लग्न जरी झालं असेल. तरी या दोघांमध्ये प्रेमाचं नातं नव्हतं. अधिपती मनापासून अक्षरावर प्रेम करत होता. पण अक्षरा या नात्याकडे मैत्रीच्या भावनेतून बघत होती. मात्र आता अक्षरादेखील अधिपतीच्या प्रेमात पडली आहे. अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली आहे. अक्षराने अनेकदा आपल्या मनातील भावना अधिपतीला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सफल झाला नाही. आता अखेर रांगड्या भाषेत अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अक्षराचं प्रमोजल ऐकून अधिपतीदेखील भारावून गेला आहे.