लहानपण देगा देवा…; ‘नवरी मिळे हिटलर’ मालिकेतील लीला रमली बालपणीच्या आठवणीत
Navari Mile Hittlerla Fame Actress Vallari Viraj on Her Childhood Memories : 'नवरी मिळे हिटलर' मालिकेतील अभिनेत्री वल्लरी विराज ही तिच्या बालपणीच्या आठवणीत रमली. तिने तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. याचवेळी वल्लरीने बालपणातील आठवणी सांगितल्या. वाचा सविस्तर...
आपलं वय कितीही असेल तरी बालपणीचा विषय निघाला की आपण सगळेच भावनिक होतो. त्या आठवणी आपल्याला आजही नॉस्टॅल्जिक करून जातात. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आपलं बालपण आपल्याला अधिक सुखकर वाटतं. कलाकारही याला अपवाद नाहीत. ‘नवरी मिळे हिटलरला’ मधील लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरी विराजही तिच्या बालपणीच्या आठवणीत रमली. तिने तिच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत. आजीच्या घरी गेल्यावर केल्या जाणाऱ्या गमतीजमती तिने सांगितल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीतील मजा- मस्तीवर वल्लरी बोलती झाली.
लहानपण देगा देवा…
शाळेत असताना सर्वजण आतुरतेने वाट पाहतात उन्हाळ्यातल्या सुट्टीची… कोणी गावी जायचं तर कोणी आई- वडीलांसोबत थंडगार ठिकाणी फिरायला जायचं. गावी जाऊन आंबे खायचे. मित्र-मैत्रिणींसोबत घड्याळ न पाहता खेळणं या सगळ्या गोष्टी म्हणजे दिनक्रम असतो. पण एकदा आपण मोठे झाल्यावर एक सुखद आठवणींमध्ये रुपांतरीत होतात. अश्याच काही गोड आठवणी ‘नवरी मिळाले हिटलरला’ फेम लीला म्हणजेच वल्लरी विराजने सांगितल्या.
वल्लरी रमली बालपणात
अभिनेत्री वल्लरी विराज ही तिच्या बालपणीच्या आठवणींमध्ये रमली. तिने या आठवणींना उजाळा दिला. शाळेत असताना समर वेकेशनमध्ये मी सकाळी लवकर उठून खेळायला जायचे. सायकल चालवायचे,आई मला आणि माझ्या भावाला राणीच्या बागेत आणि नॅशनल पार्कला फिरायला घेऊन जायची. आम्ही उन्हाळाच्या सुट्टीत आजीकडे ही राहायला जायचो आणि बर्फाचा गोळा खायचो. सध्या या सगळ्या गोष्टी सांगताना लहानपणाच्या गोड आठवणी डोळ्यासमोर आल्यात, असं वल्लरी म्हणाली.
उन्हाळ्यात रूटिन कसं असतं?
उन्हाळ्या दिवसात तिचं रूटिन कसं असतं? यावरही ती बोलती झाली. सध्या तर मुंबईत ऊन वाढलं आहे. तेव्हा मी स्वतःची काळजी घेण्यासाठी रात्री पाण्यात किंवा दुधात सब्जा भिजत घालते आणि दिवसभर ते पाणी पिते. दही खाते. लिंबू सरबत ही पिते, असं वल्लरी म्हणाली.
बाहेर जाताना डोक्यावर सतत स्कार्फ असतो. सन स्क्रीनचा वापर ही खूप करते कारण अभिनेत्री असल्यामुळे त्वचेची काळजी घ्यावी लागते. ह्या व्यतिरिक्त मी कॉटनचे लूज कपडे घालते जेणे करून ते घाम शोषून घेईल, असं म्हणत उन्हापासून काळजी कशी घ्यावी यावर वल्लरीने भाष्य केलं.