‘शितली’ची काकी झालीय समरची ‘नीलम’, मंजुषाचा ट्रान्स्फरमेशन अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल ‘वा!’

यापूर्वी ‘लागिर झालं जी’ या मालिकेत ‘शितली’च्या ‘निलम काकी’चे पात्र साकारणारी मंजुषा आता नवीन मालिकेत ग्लॅमारस ‘नीलम’ हे पात्र साकारताना दिसत आहे.

‘शितली’ची काकी झालीय समरची ‘नीलम’, मंजुषाचा ट्रान्स्फरमेशन अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल ‘वा!’
मंजुषा खेत्री
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 11:45 AM

मुंबई : सध्या मालिका विश्वात नवीन मालिकांचा बोलबाला सुरु आहे. या नव्या मालिकांमधून काही जुने चेहरे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अश्याच एका लोकप्रिय वाहिनीवर नुकत्याच सुरु झालेल्या सुरू झालेल्या “पाहिले न मी तुला” या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळत आहेत. ‘मनु’ व ‘अनिकेत’ची प्रेमकहाणी आणि शशांक केतकरची खलनायकाची भूमिका प्रेक्षकांना आवडताना दिसून येत आहे (Pahile na me tula fame actress Manjusha khetri in new bold look).

‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत महत्त्वाचा भाग असणाऱ्या एका अभिनेत्रीची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसून येत आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे मंजुषा खेत्री. यापूर्वी ‘लागिर झालं जी’ या मालिकेत ‘शितली’च्या ‘निलम काकी’चे पात्र साकारणारी मंजुषा आता नवीन मालिकेत ग्लॅमारस ‘नीलम’ हे पात्र साकारताना दिसत आहे. शितलीच्या काकीच्या रुपात दिसणारी ही अभिनेत्री यावेळी एका मॉडर्न लूकमध्ये दिसून येत आहे.

अशी होती मंजुषाची सुरुवात!

मंजुषाने ब्युटी काँटेस्ट पासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यामध्ये कोकण विभागातील अनेक स्पर्धेत विजेती ठरली होती. ‘मिस पश्चिम टाईम्स’, ‘मिस रत्नागिरी’, ‘मिस कोंकण’, ‘मिस साऊथ महाराष्ट्र’ अशा अनेक स्पर्धेत आपल्या सौंदर्याची छाप पाडत मंजुषा विजेती ठरली होती. यातूनच पुढे येत तिने आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

मंजुषाचा जन्म रत्नागिरी येथे झाला असून, ती गेल्या 10 वर्षापासून कोल्हापूर येथेच राहते. मंजुषा ही सोशल मीडियावर अगोदरपासूनच खूप सक्रिय असल्याची दिसून येते. सध्या तिच्या ट्रान्स्फरमेशन बोल्ड लूकची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होताना दिसून येते आहे. सध्या ‘पाहिले न मी तुला’ मालिकेत तिने साकारलेली ‘नीलम’ समरला तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे (Pahile na me tula fame actress Manjusha khetri in new bold look).

पाहा मंजुषाचा नवा अवतार!

काय आहे मालिकेची कथा?

‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत एका सर्वसाधारण मुलीची कथा दाखवण्यात येणार आहे, यात ती प्रियकर आणि तिचा बॉस या दोघांमध्ये अडकलेली दिसते. प्रेम आणि कर्तव्य यातून तिला प्रत्येकवेळी एका गोष्टीची निवड करायची आहे.

शशांकची नकारात्मक भूमिका!

या मालिकेच्या माध्यमातून ‘हँडसम हँक’ शशांक केतकर पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. शशांकसोबत या मालिकेत अभिनेत्री तन्वी मुंडले आणि ‘माझा होशील ना? फेम ‘सुयश’ अर्थात अभिनेता आशय कुलकर्णी मुख्य भूमिका साकारत आहेत. शशांकने याआधी मालिकेचा प्रोमो शेअर करत, ‘आता कदाचित मला शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे’, असं गमतीनं म्हटलं होतं. नुकताच मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आहे आणि मालिकेला रसिक प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यापुढे दररोज संध्याकाळी 7 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(Pahile na me tula fame actress Manjusha khetri in new bold look)

हेही वाचा :

PHOTO | पांढऱ्या रंगाच्या साडीत खुललं ‘गोरी मेम’चं सौंदर्य, पाहा नेहाचे सुंदर फोटो…

Sonu Sood | ‘एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण चुकणार नाही!’ सोनू सूदचा ठाम निश्चय, ऑनलाईन शिक्षणासाठी देणार मोबाईल!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.