हिरोईनला उचलून स्क्वॅट, ट्रोलर म्हणतो, संस्कृती आणि इज्जत दाखवू नका, अभिनेत्याचं भन्नाट उत्तर

अभिनेता आशय कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मानसीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तन्वी मुंडे हिला त्याने खांद्यावर उचलून स्क्वॅट मारले आहेत (Actor Aashay Kulkarni troll )

हिरोईनला उचलून स्क्वॅट, ट्रोलर म्हणतो, संस्कृती आणि इज्जत दाखवू नका, अभिनेत्याचं भन्नाट उत्तर
अभिनेता आशय कुलकर्णी
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 10:19 AM

मुंबई : झी मराठी वाहिनीवर नव्याने सुरु झालेल्या ‘पाहिले ना मी तुला’ (Pahile Na Me Tula) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) पहिल्यांदाच समरप्रताप जहागिरदार ही खलनायकाची भूमिका साकारत आहे. तर ‘माझा होशील ना’ (Majha Hoshil Na) मालिकेतील डॉक्टरच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) अनिकेतची व्यक्तिरेखा साकारत आहे. आशयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओवर एका टवाळ युजरने कमेंट केली. मात्र त्याला अभिनेत्याने चोख उत्तर देत गपगार केलं. (Pahile Na Me Tula Fame Marathi Actor Aashay Kulkarni answers troll on Instagram Video)

मालिकेत काय घडतंय?

महाराष्ट्रातील लॉकडाऊनमुळे ‘पाहिले ना मी तुला’ मालिकेचं शूटिंग गोव्यात सुरु आहे. मालिकेमध्ये अनिकेत आणि मानसी यांनी लपून केलेल्या लग्नाचं गुपित आई-वडिलांसमोर फोडल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे चिडून वडील तिला घराबाहेर हाकलतात. त्यानंतर अनिकेत आणि मानसी नव्या संसाराला सुरुवात करतात. पाणी भरण्यासाठी मानसीला लांब नळावर जावं लागतं. मात्र तिला आडकाठी करत अनिकेत तिच्यासह बालदी उचलून घेतो, असं काहीसं कथानक मालिकेत दाखवलं आहे.

मालिकेतील सीनवरुन आशयचा व्हिडीओ

याच सीनला पुढे नेत अभिनेता आशय कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मानसीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तन्वी मुंडे हिला त्याने खांद्यावर उचलून स्क्वॅट मारले आहेत. ‘उचलले ना मी तुला… 50 किलो स्क्वॅट चॅलेंज’ असं कॅप्शन देत आशयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये साडी नेसलेल्या मानसीच्या गेटअपमध्येच तन्वी आहे.

ट्रोलरची कमेंट काय?

आशय कुलकर्णीच्या व्हिडीओवर एका टवाळ युजरने कमेंट केली आहे. “लाईक कमेंटसाठी अशी स्वतःची इज्जत आणि संस्कृती दाखवू नका” अशी कमेंट त्याने केली होती. त्यावर आशयनेही “अजिबात इज्जत आणि संस्कृती घालवलेली नाहीये. आधी लक्ष वेधून घेण्यासाठी अशा कमेंट्स करणं बंद करा” असं प्रत्युत्तर दिलं. आशय कुलकर्णी इन्स्टाग्रामवर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. तो नेहमीच आपले फोटो-व्हिडीओ इन्स्टा स्टोरी आणि पोस्टच्या माध्यमातून शेअर करत असतो. चाहत्यांच्या कमेंट्सना तो उत्तरही देतो. मात्र ट्रोलरला त्याने दिलेलं उत्तर अनेकांचं मन जिंकून घेत आहे. (Actor Aashay Kulkarni troll )

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | “तू बुधवार पेठेतील ** आहेस” इन्स्टाग्राम युझरच्या कमेंटवर मानसी नाईकचं लाईव्ह उत्तर

“अत्यंत घाण भाषेत आम्हीही रिअ‍ॅक्ट होऊ शकतो” प्रेक्षकाच्या अश्लाघ्य टीकेवर अभिनेता शशांक केतकर संतापला

(Pahile Na Me Tula Fame Marathi Actor Aashay Kulkarni answers troll on Instagram Video)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.