Rang Maza Vegla | ऑन स्क्रीन वैर, मात्र ऑफ स्क्रीनवर धमाल, पाहा डॉक्टर कार्तिक आणि श्वेताचा डान्स!

नुकताच या दोघांचा एक धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओत अनघा आणि आशुतोष एक जबरदस्त डान्स पर्फोर्मंस देताना दिसत आहेत.

Rang Maza Vegla | ऑन स्क्रीन वैर, मात्र ऑफ स्क्रीनवर धमाल, पाहा डॉक्टर कार्तिक आणि श्वेताचा डान्स!
श्वेता-कार्तिकचा धमाल व्हिडीओ
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 12:52 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ सध्या खूप चर्चेत आहे. मालिकेचे वेगळे कथानक आणि तगडी स्टारकास्ट यामुळे मालिका सध्या टीआरपी शर्यतीतही अव्वल ठरते आहे. या मालिकेतील ‘दीपा’, ‘कार्तिक’, ‘श्वेता’, ‘सौंदर्या’ या पात्रांसह इतरही पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. यात डॉक्टर कार्तिकची भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष गोखले आणि श्वेताचे पात्र साकारणारी अभिनेत्री अनघा अतुल ऑन स्क्रीन जरी एकमेकांचे वैरी दाखवले असले, तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र हे दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत (Rangh Maza Vegla fame aashutosh gokhale and anaghaa atul shares dance video on social media).

नुकताच या दोघांचा एक धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओत अनघा आणि आशुतोष एक जबरदस्त डान्स पर्फोर्मंस देताना दिसत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम रिलवर त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

पाहा ‘हा’ धमाल व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Aashutosh Gokhale (@aashu.g)

(Rang Maza Vegla fame aashutosh gokhale and anaghaa atul shares dance video on social media)

अभिनेता आशुतोष गोखले हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. अभिनयाव्यतिरिक्त तो सामाजिक उपक्रमात देखील सहभागी होत असतो. त्याच्या या सहभागाचे नेहमीच कौतुक होत असते. तो त्याच्या या सामाजिक उपक्रमांची माहिती सोशल मीडियावर शेअर करत असतो.

मालिकेचा रसिक प्रेक्षकांवर प्रभाव!

‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. काहीच दिवसांपूर्वी या मालिकेने 100 भागांचा यशस्वी टप्पा पार केला होता. वर्णभेदावर भाष्य करणारी ही मालिका पाहून यवतमाळ येथील राणी भुते ही युवती प्रेरीत झाली आणि तिने मुलाचा वर्ण न पाहाता विवाह करण्याचा निर्णय घेतला होता (Rang Maza Vegla fame aashutosh gokhale and anaghaa atul shares dance video on social media).

व्यवसायाने कॉम्प्युटर इंजिनिअर असणारी 27 वर्षांची राणी रंग माझा वेगळा मालिकेची चाहती आहे. वर्णभेदावर भाष्य करणारा मालिकेचा विषय आणि दिला जाणारा संदेश राणीला मनापासून पटल्यामुळेच, तिने अनुराग मिसाळ यांच्याशी लग्न करण्याचे ठरवले आणि तिला या निर्णयात कुटुंबाचीही साथ मिळाली.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत कार्तिक ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या आशुतोष गोखलेशी राणी यांनी संपर्क साधला. या निमित्ताने या जोडप्याला मालिकेच्या सेटवर बोलवण्यात आले होते. रंग माझा वेगळाच्या संपूर्ण टीमने त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या अनोख्या अनुभवाविषयी सांगताना आशुतोष गोखले म्हणाला, ‘जो विषय पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय याचा आनंद आहे. मालिकेमुळे मतपरिवर्तन होत असेल तर ही खूप महत्त्वाची बाब आहे. या प्रसंगामुळे आम्ही सर्वच खूप भारावून गेलोय!’

(Rang Maza Vegla fame aashutosh gokhale and anaghaa atul shares dance video on social media)

हेही वाचा :

प्रसिद्ध मराठी अभिनेता पुन्हा एकदा विवाहबंधनात, ‘या’ खास व्यक्तीशी बांधली लग्नगाठ!

Kapil Sharma | रणबीर-आलिया-संजयच नाही, तर कपिल शर्मालाही बसला कोरोनाचा मोठा फटका!

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.