Good News | ‘रोडीज’ फेम रणविजय सिंघाकडे पुन्हा एकदा ‘बाबा’ बनणार! सोशल मीडियावर शेअर केला ‘हा’ खास फोटो!

‘रोडीज’ फेम अभिनेता रणविजय सिंघाच्या (Rannvijay Singha) घरी थोड्याच दिवसांत चिमुकल्या पाहुण्याची एंट्री होणार आहे.

Good News | ‘रोडीज’ फेम रणविजय सिंघाकडे पुन्हा एकदा ‘बाबा’ बनणार! सोशल मीडियावर शेअर केला ‘हा’ खास फोटो!
रणविजय सिंघा आणि कुटुंब
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 3:22 PM

मुंबई : ‘रोडीज’ फेम अभिनेता रणविजय सिंघाच्या (Rannvijay Singha) घरी थोड्याच दिवसांत चिमुकल्या पाहुण्याची एंट्री होणार आहे. रणविजय सिंघा आणि त्याची पत्नी प्रियंका सिंघा पुन्हा एकदा पालक होणार आहेत. प्रियांका दुसऱ्यांदा गर्भवती आहे. या जोडी आधीही एका मुलीची पालक आहे. त्यांच्या मुलीचे नाव कायनात आहे. रणविजय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घरात येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याची माहिती दिली आहे. त्याने आपल्या पत्नीबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गर्भवती दिसत आहे. या चित्रात त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत दिसत आहे (Rannvijay Singha And wife priyanka singha expecting second child).

सोशल मीडियावर हे सुंदर छायाचित्र शेअर करत रणविजयने लिहिले की, ‘मला तुम्हा तिघांचीही आठवण येत आहे… सतनाम वाहेगुरू’. या फोटोत ‘ती’ तिसरी व्यक्ती म्हणजे रणविजयच्या घरी येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याविषयी ती बोलत आहे. कारण, त्याच्याशिवाय या फोटोत आणखी केवळ दोन लोक आहेत. मात्र, या फोटोत त्याने प्रियंकाच्या बेबी बंपवर हात ठेवला आहे.

आम्ही तिघेही तुझी वाट बघतोय!

View this post on Instagram

A post shared by Rannvijay (@rannvijaysingha)

(Rannvijay Singha And wife priyanka singha expecting second child)

रणविजयच्या आधी त्याची पत्नी प्रियंका सिंघा हिने एक गोड व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये प्रियंका आणि रणविजय सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांची मुलगी कायनातही त्यांच्यासोबत धमाल करत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्रियंकाने लिहिले की, ‘डॅडी… आम्ही तिघे तुम्हाला मिस करतोय. लवकरच भेटण्यासाठी आता प्रतीक्षा करू शकत नाही! सतनाम वाहेगुरू.’ प्रियांकाच्या या पोस्टवर, रणविजयने तीन कमेंट केल्या आहेत आणि तिन्हीमध्ये त्याने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत (Rannvijay Singha And wife priyanka singha expecting second child).

प्रियंकाची पोस्ट

(Rannvijay Singha And wife priyanka singha expecting second child)

बाबा झाल्यावर जबाबदार झालो!

अभिनेता रणविजय सिंघा सध्या व्हीजे म्हणून काम करतो आहेत. याशिवाय तो एम.टी.व्ही.चा एक मोठा नावाजलेला चेहरा आहे. रणविजय आणि प्रियांकाची भेट पहिल्यांदा एका कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली आणि यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबीयांना लग्नासाठी राजी केले. एका बाळाचे पिता झाल्यावर आपणही जबाबदार झालो आहोत, असे रणविजय सिंघा नेहमी सांगतो.

रणविजयच्या दुसर्‍या मुलाच्या जन्माबद्दल ‘रोडीज’चे संपूर्ण कुटुंब खूप उत्सुक आहे. वरुण सूद यांनी या फोटोच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, ‘आता आणखी वाट बघण्याची इच्छा नाहीय.’ संयुक्त हेगडे, श्वेता मेहता, श्रुती सिन्हा, लॉरेन गोटिलेव आदींनीही या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. अंगद बेदी याने देखील या फोटोवर कमेंट करत लिहिले की, तो या बातमीमुळे खूप आनंदित आहे. रणविजयच्या पहिल्या मुलीचा जन्म लंडनमध्ये झाला होता.

(Rannvijay Singha And wife priyanka singha expecting second child)

हेही वाचा :

Taapsee Pannu | BMW, Mercedes सारख्या लक्झरी गाड्यांचा शौक, कोटींची संपत्ती! वाचा तापसीचा इन्कम फॉर्म्युला…

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.