Ratris Khel Chale 3 | ‘रात्रीस खेळ चाले 3’मध्ये ‘शेवंता’ बदलणार! अपूर्व नेमळेकरने मालिकेतून घेतली एक्झिट!

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्वातही ‘शेवंता’ हेच पात्र मुख्य आकर्षण होते. ‘शेवंता’ या पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. मालिकेतील या पात्राला सर्वाधिक पसंत केले गेले होते. मात्र, आता अपूर्वा मालिका सोडणार असल्याने प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला आहे.

Ratris Khel Chale 3 | ‘रात्रीस खेळ चाले 3’मध्ये ‘शेवंता’ बदलणार! अपूर्व नेमळेकरने मालिकेतून घेतली एक्झिट!
Apurva Nemlekar
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 10:41 AM

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले 3’ (Ratris Khel Chale 3) या मालिकेत सध्या नव्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. मालिकेतील ‘माई’, ‘अण्णा नाईक’, ‘शेवंता’ या मुख्य पात्रांसह इतर सह पात्रांना देखील तितकीच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र आता या मालिकेतील एक मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री मालिकेतून एक्झिट घेत असल्याची चर्चा आहे. होय, मालिकेत ‘शेवंता’ (Shevanta) साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) ही मालिका सोडल्याची चर्चा सुरु आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्वातही ‘शेवंता’ हेच पात्र मुख्य आकर्षण होते. ‘शेवंता’ या पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. मालिकेतील या पात्राला सर्वाधिक पसंत केले गेले होते. मात्र, आता अपूर्वा मालिका सोडणार असल्याने प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला आहे. मात्र, अपूर्वाने ही मालिका का सोडली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिच्या जागी लवकरच अभिनेत्री कृतिका तुळसकर ही भूमिका साकारताना दिसणार आहे.

अपूर्व म्हणाली ‘तिने’ माझं आयुष्य बदललं!

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते. इतकेच नव्हे तर, नेहमी नवनवीन फोटोशूट करून त्यातील फोटो देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी अपूर्वाने असेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये अपूर्वाने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला होता. काळेभोर केस मोकळे सोडत तिने स्वतःच्या मोबाईलमधूनच हे फोटो क्लिक केले होते.

या फोटोंपैकी एका फोटोला तिने, ‘धीस लेडी चेंज माय लाईफ’ अर्थात ‘या स्त्रीने माझे आयुष्य बदलले’, असे खास कॅप्शन देखील दिले होते. या फोटोमध्ये नीट निरखून पाहिल्या अपूर्वाच्या आयुष्यातील ‘ती’ खास व्यक्ती दिसून येते. अपूर्वाच्या या फोटोत मागील भिंतीवर ‘शेवंता’ची काही स्केच फ्रेम करून लावलेली आहे. अर्थात ‘शेवंता’ बनून अपूर्वा घराघरांत पोहोचली आहे. त्यामुळेच तिने तिच्या या यशाचे श्रेय ‘शेवंता’ या पात्राला दिले होते. असे असताना देखील अपूर्वाने असा निर्णय का घेतला, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाला उदंड प्रतिसाद!

22 फेब्रुवारी 2016मध्ये चालू झालेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेन नुसता धुमाकूळ घातला होता. तळकोकणातल्या एका वाड्यातला नाईकांचा एक कुटुंब अस्सल मालवणी भाषेत प्रेक्षकांच्या समोर आले होते. अण्णा नाईकांच्या कुटुंबाची कथा सुरुवातीपासूनच गाजत होती. अण्णा, अण्णाची बायको, माधव, दत्ता, नीलिमा, सरिता, छाया आणि अभिराम ही पात्रं तर फेमस झाली, पण त्यापेक्षाही वरचढ ठरले पांडू, सुशल्या आणि शेवंता! सुरुवातीला कोकणची बदनामी होते म्हणून मालिकेला विरोध झाला. पण जसजसे कथानक पुढे सरकत गेले, तसतसा हा विरोधही मावळत गेला. पहिल्या पर्वामध्ये पहिल्याच भागात अण्णा गेले, असे दाखवले आणि कथानक पुढे नेले होते. पण दुसऱ्या पर्वामध्ये मात्र अण्णांचा पूर्ण जीवनपटच दाखवला होता. या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच लोकांनी कार्यक्रमाला डोक्यावर घेतले होते.

हेही वाचा :

निलेश साबळेंनी मागितली नारायण राणेंची माफी, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात नेमकं काय घडलं ?

International Emmy Awards 2021 : यंदा भारताच्या पदरी निराशा, सुष्मिताच्या ‘आर्या’ला नामांकन, मात्र पुरस्कार हुकला!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.