Ratris Khel Chale 3 | ‘शेवंता’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अपूर्वाने फोटो शेअर करत दिले संकेत!

‘कोकणातली भूता लई वाईट, एकदा का झाड धरल्यानी की सोडनात नाय…’, ही टॅगलाईन तुमच्या आठवणीत असेलच! अगदी बरोबर! सगळ्यांची आवडती मालिका अर्थात ‘रात्रीस खेळ चाले’चे तिसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ratris Khel Chale 3 | ‘शेवंता’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अपूर्वाने फोटो शेअर करत दिले संकेत!
अपूर्वा नेमळेकर
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 3:21 PM

मुंबई : ‘कोकणातली भूता लई वाईट, एकदा का झाड धरल्यानी की सोडनात नाय…’, ही टॅगलाईन तुमच्या आठवणीत असेलच! अगदी बरोबर! सगळ्यांची आवडती मालिका अर्थात ‘रात्रीस खेळ चाले’चे तिसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या दोन पर्वांप्रमाणेच या तिसऱ्या पर्वतही तितके गूढ वातावरण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. दरम्यान, सगळीकडे ‘अण्णा नाईक परत येणार…’, ही चर्चा सुरु आहे. या सगळ्यात ‘शेवंता’ पुन्हा दिसणार का?, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, लवकरच भेटू, म्हणत खुद्द शेवंतानेच आपल्या आगमनाची चाहूल दिली आहे (Ratris Khel Chale 3 update shevanta will return soon apurva nemlekar gives hint).

मालिका विश्वात पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचे आगमन होत आहे. याच निमित्ताने मालिकेतील ‘अण्णा’, ‘शेवंता’ आणि ‘माई’ ही मुख्य पात्र पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. यातही ‘शेवंता’ साकारात घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या अधिक चर्चेत आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील थरार, रहस्य या सगळ्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर या मालिकेचा दुसरा भाग मिळाला.

त्यातही अण्णा नाईकांचा दराराही चांगलाच चर्चेत राहिला. त्यानंतर सगळ्यांचं लक्ष वेधलं ते शेवंताने. शेवंता हे पात्र या मालिकेत आलं आणि त्यानंतर अण्णा नाईक आणि शेवंता यांच्या जोडीची चर्चा झाली. आता तिसऱ्या भागातही अण्णांसोबतच शेवंताही पुन्हा भेटीला येत आहे. शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतच ती परत येणार असल्याची गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे.

‘लवकरच भेटू…’ पहा अपूर्वाची पोस्ट

 (Ratris Khel Chale 3 update shevanta will return soon apurva nemlekar gives hint)

पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाला उदंड प्रतिसाद!

22 फेब्रुवारी 2016मध्ये चालू झालेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेन नुसता धुमाकूळ घातला होता. तळकोकणातल्या एका वाड्यातला नाईकांचा एक कुटुंब अस्सल मालवणी भाषेत प्रेक्षकांच्या समोर आले होते. अण्णा नाईकांच्या कुटुंबाची कथा सुरुवातीपासूनच गाजत होती. अण्णा, अण्णाची बायको, माधव, दत्ता, नीलिमा, सरिता, छाया आणि अभिराम ही पात्रं तर फेमस झाली, पण त्यापेक्षाही वरचढ ठरले पांडू, सुशल्या आणि शेवंता!

सुरुवातीला कोकणची बदनामी होते म्हणून मालिकेला विरोध झाला. पण जसजसे कथानक पुढे सरकत गेले, तसतसा हा विरोधही मावळत गेला. पहिल्या पर्वामध्ये पहिल्याच भागात अण्णा गेले, असे दाखवले आणि कथानक पुढे नेले होते. पण दुसऱ्या पर्वामध्ये मात्र अण्णांचा पूर्ण जीवनपटच दाखवला होता. या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच लोकांनी कार्यक्रमाला डोक्यावर घेतले होते. त्यामुळे आत तिसऱ्या पर्वाकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत.

(Ratris Khel Chale 3 update shevanta will return soon apurva nemlekar gives hint)

हेही वाचा :

Video | वीणा नाही, तर शिव ठाकरेचा ‘या’ अभिनेत्रीसोबत रोमान्स, रोमँटिक अंदाजात दिसली जोडी!

Rashmika Mandanna | रश्मिकाच्या नव्या लूकवर चाहते झाले फिदा, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण!

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.