Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारावर रिक्षा चालवण्याची वेळ

‘फिरोज खान’ यांच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं डान्सवर प्रचंड प्रेम आहे. त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 70 ते 80 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (read the astonishing journey of dancer to rickshaw driver Fhiroz Khan )

Video : माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारावर रिक्षा चालवण्याची वेळ
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 3:35 PM

मुंबई : ‘डान्स दिवाने’  (Dance Deewane) या डान्स शोचे अनेक चाहते आहेत.या शोमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) परिक्षकाची भूमिका साकारते. तर सध्या सोशल मीडियावर या डान्स शोच्या सेटवरील एक व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओमध्ये अभिनेता सलमान खान, अनिल कपूर आणि अभिनेत्री जॅकलिन पाहुणे म्हणून पोहोचले आहेत. तर आपल्या डान्सनं सर्वांचं मन जिंकण्यासाठी स्पेशल कंटेस्टंट या शोमध्ये पोहोचला होता. फिरोज यांनी अनिल कपूर यांच्यासोबत त्यांनी ‘एक दोन तीन’ या गाण्यावर डान्स केला होता. तर माधुरी दीक्षित यांच्यासोबतही अनेक चित्रपटांमध्ये डान्स केला आहे. (The astonishing journey of dancer to rickshaw driver Fhiroz Khan)

‘फिरोज खान’ असं या व्यक्तीनं नाव आहे. फिरोज हे चक्क 52 वर्षाचे आहे आणि त्यांचं डान्सबद्दल असलेलं वेड त्यांना या शोच्या सेटवर घेवून आलं.  फिरोज यांच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं डान्सवर प्रचंड प्रेम आहे. त्यातही खासमध्ये त्यांचं बॉलिवूड स्टाईल आणि सेमी क्लासिकल स्टाईलवर जास्त प्रेम आहे. अनिल कपूर यांच्यासोबत त्यांनी ‘एक दोन तीन’ या गाण्यावर डान्स केला होता. त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 70 ते 80 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर त्यांचं एक डान्स क्लास सुरू करण्याचं स्वप्न आहे.  मात्र परिस्थिती बिकट असल्यानं त्यांनी रिक्षा चालवायला लागलं. डान्स दिवानेच्या सेटवर त्यांच्या नृत्यानं चार चाँद लावले.  या शोमध्ये त्यांनी जुन्या गाण्यांवर त्यांनी चांगलाच ठेका धरला. एवढंच नाही तर डान्सवर प्रचंड प्रेम असल्याचंही त्यांनी सांगितलं.

परिक्षकांकडून फिरोज यांचं कौतुक

परिक्षकांकडून फिरोज यांचं प्रचंड कौतुक करण्यात आलं. तसेच त्यांनी माधुरी दीक्षित यांनी फिरोज यांच्या रिक्षामध्ये बसण्याचंही म्हटलं. तसेच अनिल कपूर यांनी फिरोज यांच्या डान्समध्ये अधिकच सुधारणा झाल्याचं म्हटलं.

परिस्थिती दोन हात करत कला जोपासली

परिस्थिती कशीही असो कला अवगत असली तर माणूस श्रीमंत असतो हे फिरोज यांनी दाखवून दिलं. परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी आपली कला जोपासली हे खरंच कौतुक करण्यासारखं आहे. त्यांच्या याच जिद्दीमुळे परिक्षकही आवाक झालेले पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या

‘गंगूबाई काठियावाडी’चे शूटिंग सुरू, अजय देवगणही चित्रीकरणात व्यस्त; पाहा फोटो

चाहत्याने मागितला चक्क स्मार्टफोन, सोनूने दिले ‘हे’ भन्नाट उत्तर!

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.