Khoya Khoya Chand | आईच्या हट्टासाठी अभिनय क्षेत्रात आली सनाया इराणी, पाहा आता काय करतेय अभिनेत्री…
अभिनेत्री सनाया इराणीला (Sanaya Irani ) कोण ओळखत नाही? अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना वेड लावले होते. सनायाने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक उत्तम टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सनाया तिच्या अभिनयामुळे आणि क्यूटनेसमुळे चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होती.
मुंबई : अभिनेत्री सनाया इराणीला (Sanaya Irani ) कोण ओळखत नाही? अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना वेड लावले होते. सनायाने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक उत्तम टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सनाया तिच्या अभिनयामुळे आणि क्यूटनेसमुळे चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होती. मात्र, सनाया आजकाल मालिकांच्या दुनियेपासून दूर दिसत आहे.
सनाया इराणीने अनेक टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सनायाने तिच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळी पात्रे साकारली आहेत. चला तर, जाणून घेऊया सनाया सध्या कुठे आहे आणि काय करते आहे….
आईने दिला सल्ला
सनायाने आपले शालेय शिक्षण उटीमधून पूर्ण केले आहे. तिने उटी येथील बोर्डिंग स्कूलमध्ये सात वर्षे शिक्षण घेतले. यानंतर या टीव्ही अभिनेत्रीने मुंबईतील सिडेनहॅम कॉलेजमधून एमबीएचे शिक्षण घेतले. ज्यावेळी सनाया एमबीएचे शिक्षण घेत होती, त्यावेळी तिच्या आईने तिला मॉडेलिंग आणि अभिनय करण्याचा सल्ला दिला होता. आईच्या सल्ल्यानंतर तिने मॉडेलिंग विश्वात प्रवेश केला. मॉडेलिंगमध्ये सेट झाल्यानंतरच ती अभिनयाकडे वळली. अर्थात अभिनेत्रीने तिच्या आईच्या सल्ल्यानुसार अभिनयक्षेत्राची निवड केली.
मनोरंजन विश्वात पदार्पण
चाहत्यांना क्वचितच माहित असेल की, अभिनेत्रीचा पहिला मॉडेलिंग पोर्टफोलिओ अभिनेता बोमन इराणी यांनी शूट केला होता. चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सनाया इराणी हिने 2006मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर अभिनेत्रीने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले.
टीव्ही विश्वात पदार्पण करणारी सनाया प्रथम आमिर खान आणि काजोलच्या सुपरहिट चित्रपट फनामध्ये दिसली होती. यातही अभिनेत्रीने आपल्या छोट्याशा भूमिकेने सर्वांना वेड लावले होते.
जाहिरातींचा बनली चेहरा!
अभिनयाव्यतिरिक्त सनायाने अनेक जाहिरातींमध्येही आपली छाप सोडली आहे. सनायाने शाहरुख खान, सैफ अली खान, प्रियंका चोप्रा आणि करीना कपूर सारख्या अनेक स्टार्ससोबत जाहिरातींमध्ये काम केले आहे. टीव्ही सीरियल ‘लेफ्ट राईट लेफ्ट’मध्ये सनाया प्रथम चाहत्यांना दिसली. अभिनेत्रीची ही प्रसिद्ध मालिका 2007मध्ये प्रदर्शित झाली होती. या मालिकेतून अभिनेत्रीला खरी ओळख मिळाली. 2007 ते 2019पर्यंत, सनाया अभिनय जगतात सक्रिय होती. ती शेवट 2019मध्ये ‘होस्ट’मध्ये दिसली होती, तेव्हापासून सनाया अभिनय जगापासून दूर आहे.
‘या’ अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ!
सनाया इराणीने ‘मिले जब हम तुम’, ‘इस प्यार को क्या नाम दूं’ आणि ‘रंग रसिया’ यासारख्या अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. लाखो हृदयावर राज्य करणाऱ्या सनायाचे मन अभिनेता मोहित सहगलवर आले होते. 2016मध्ये तिने प्रसिद्ध टीव्ही अभिनेता मोहित सहगलसोबत लग्न केले. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी सात फेरे घेतले.
हेही वाचा :
Sonu Sood Net Worth | ज्या सोनू सुदच्या घरी आयकरची टीम पोहोचलीय, तो वर्षाला किती कमावतो माहितीय का?
कियारा अडवाणीचा ‘टाय-डाय’ लूक सोशल मीडियावर चर्चेत, फोटोंवरून हटणार नाही तुमचीही नजर!