‘चला हवा येऊ द्या’नंतर श्रेया बुगडेचा नवा कोरा कार्यक्रम; प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज
Shreya Bugde Amruta Khanvilkar Sankarshan Karhade New Reality Show : झी मराठीवर एक नवा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या कार्यक्रमातून श्रेया बुगडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काय आहे हा कार्यक्रम? वाचा सविस्तर बातमी.......
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रचंड गाजला या कार्यक्रमाने 10 वर्षे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. त्यानंतर या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता या कार्यक्रमातील कलाकार विविध माध्याम दिसत आहेत. विविध कार्यक्रमातून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडे ही देखील आता एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीवरच्या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून श्रेया बुगडे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ड्रामा ज्युनियर्स’ हा नवाकोरा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात श्रेया महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
श्रेयाचा नवा कार्यक्रम
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमानंतर श्रेया आता नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ड्रामा ज्युनियर्स’ या कार्यक्रमातून श्रेया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, अमृता खानविलकर हे देखील या कार्यक्रमात दिसणार आहेत. श्रेया बुगडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. याचा प्रोमो रिलीज झाला आहे. यात बालकलाकार धुमाकूळ घालताना दिसत आहेत. लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘ड्रामा ज्युनियर्स’चा प्रोमो
झी मराठीवर एक ब्रेकिंग न्यूज प्रसारित झाली. ती म्हणजे दोन नामवंत कलाकारांच्या अपहरणाबद्दल. संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकरचं अपहरण झालंय. संकर्षण एका जाहिरातीसाठी शूट करत असताना त्याला त्याचवेळी एका वाहनात टाकून नेण्यात आलं. तर दुसरीकडे अमृताला आपल्या व्हॅनिटीमधून बाहेर पडताच तिचे चाहते आणि बॉडीगार्डच्या उपस्थितीत किडनॅप केले गेले.
View this post on Instagram
आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार हा सगळं कारनामा केला होता आपल्या छोट्या बच्चे कंपनीने…. आता ही लहान मुलं आणखी काय ड्रामा करणार हे लवकरच कळेल. पण ह्या शो च्या निमित्ताने ‘संकर्षण कऱ्हाडे’ आणि ‘अमृता खानविलकर’ हे ह्या रिऍलिटी शो चे परीक्षक असणार आहेत तर सूत्रसंचालनाची धुरा श्रेया बुगडे सांभाळणार आहे. तेव्हा पोरांचा ड्रामाच करणार कारनामा… हा असा बालकलाकारांचा ड्रामा बघायचा असेल तर ‘ड्रामा ज्युनियर्स’ हा रिअॅलिटी शो पाहावा लागणार आहे.