‘मुलगी झाली हो’ मालिकेतील कलाकारांमध्ये उभी फूट! एका गटासाठी किरण माने हिरो, तर दुसऱ्या गटासाठी झिरो का?

Kiran Mane : राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे किरण मानेंची. किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर सोशल मिडीयावर बरीच चर्चा झाली. शरद पवारांची किरण मानेंनी भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं.

'मुलगी झाली हो' मालिकेतील कलाकारांमध्ये उभी फूट! एका गटासाठी किरण माने हिरो, तर दुसऱ्या गटासाठी झिरो का?
किरण मानेंवरुन मालिकेतच दोन गट
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 6:27 PM

सातारा : कलाकार किरण मानेंना (Kiran Mane) मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकल्यानंतर राज्याचं राजकारणंही ढवळून निघालंय. मात्र मालिकेतून काढून का टाकलं ? यावरुनच आता मुलगी झाली हो मालिकेतील सहकलाकारांमध्ये दोन गट पडले आहेत. काहींनी किरण मानेंवर गंभीर आरोप करत त्यांना व्हिलन करुन टाकलं आहे, तर काही सहकलाकार यांनी किरण मानेंच्या समर्थनात वक्तव्य करत किरण मानेंचं कौतुक केलंय. एकूण आता ही मालिका चर्चेत आली असून या मालिकेतून (Marathi Serial Mulgi Jhali Ho) सहकलाकारांमध्ये उभी फूट पडली असल्याचं पाहायला मिळतंय. किरण माने यांनी राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं, असं सांगण्यात येत होतं. मात्र अखेर यावर पडदा टाकत महिला कलाकारांसोबत केलेल्या वर्तवणुकीमुळे आणि तक्रारींमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं स्पष्टीकरण स्टार प्रवाह वाहिनीनं दिलं आहेत. दरम्यान, याच मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेल्या दिव्या पुगावकर (मावू), शर्वरी पिल्लई (विलास यांची पत्नी), सविता मालपेकर (मुलीची आजी) तसंच मालिकेचे दिग्दर्शक सचिन देव यांनीही किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे याच मालिकेतील इतर सहकलाकारांच्या एका गटानं किरण माने यांना पाठिंबा दिल्यानं चर्चांना उधाण आलंय.

कोण काय म्हणालं?

राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे किरण मानेंची. किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर सोशल मिडीयावर बरीच चर्चा झाली. शरद पवारांची किरण मानेंनी भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. तर भेटीनंतर सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या वाई तालूक्यातील गुळूंब (मयुरेश्वर) या ठिकाणी सुरू असलेल्या चित्रीकरणाला परवानगी नाकारण्यात येतीये अशा आशयाचं पत्र व्हायरलं झालं. वाई तालुक्यातील मयुरेश्वर या ठिकाणी या मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे.ग्रामपंचायतचं पत्र व्हायरल झाल मात्र प्रत्यक्षात मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे. किरण मानेंच्या आरोपांवर सह कलाकारांना विचारलं असता त्यांनी किरण मानेंवरच गंभीर आरोप केलेत. मालिकेतील मुख्य कलाकार दिव्या पुगावकरनं किरण मानेंवर आरोप करताना माने हे सतत टोमणे मारायचे आणि अपशब्द माझ्याशी बोलले, असा आरोप केलाय.

पाहा व्हिडीओ – किरण मानेंविरोधात बोलणारे सहकलाकार कोण आहेत?

किरण माने सेटवर चांगले वागत नसत, असं काही सहकलाकारांचं म्हणणं आहे. दरम्यान, किरण मानेंमुळे गावातील राजकारणही ढवळून निघालंय. किरण मानेंसारखी भूमिका इतर कलाकार करू शकणार नाहीत, अशी प्रतिक्रिया एका ग्रामस्थानं दिलीये. किरण मानेंना काढणं चुकीचं आहे, मात्र जर ते इतर कलाकारांसोबत, असे वागले असतील तर ते चुकीचंच आहे, अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

माणूस म्हणून दिलदार

काही सहकलाकारांनी प्रतिक्रिया देत किरण मानेंना पाठिंबा दिला आहे. किरण माने हे एक चांगली व्यक्ती आहेत. त्यांनी आमच्यापैकी कुणाशीही गैरवर्तन केलेलं नाही. दरम्यान, काही कलाकारांशी त्यांनी बोलताना अपशब्द वापरले असल्याच्या आरोपावर एका महिला सहकालाकारनं म्हटलंय, की सहकलाकार म्हणून ते नेहमीच पाठीशी उभे राहतात. त्यांनी आतापर्यंत माझ्यासमोर तरी कधीच शिवी दिलेली नाही. कधीच घाणेरड्या भाषेत ते बोललेले नाहीत. व्यक्ती म्हणून ते दिलदार आहेत. तर आणखी एका महिला सहकर्मीनं किरण मानेंबाबत बोलताना म्हटलंय की, किरणसरांसोबत आमचा बॉन्ड एकदम चांगला आहे. त्यांनी नेहमीच आम्हाला सहकार्य केलंय, असंही एका महिला सहकलाकारानं किरण मानेंसोबत बोलताना म्हटलंय. तर आणखी एका महिला सहकलाकारानं बोलताना म्हटलंय की, माझं आणि किरण सर यांचं नातं हे बापलेकीप्रमाणंच आहे.

पाहा व्हिडीओ – किरण मानेंच्या बाजूनं बोलणारे सहकलाकार कोण आहेत?

संबंधित बातम्या :

मुलगी झाली हो मालिकेचं शूटिंग बंद पाडण्याचा कट? ग्रामस्थांनी सांगितलं, असं तर काहीच नाही!

चार एक संघविचारी माझ्या विरोधात आहेत, मी बी कंबर कसलेली हाय, Kiran Mane यांची Facebook पोस्ट

Kiran Mane : मी बी कंबर कसलेली हाय… फेसबुकवर पोस्ट शेअर करत अभिनेते किरण माने यांनी दिला इशारा!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.