ईशाचा घटस्फोट, संपत्तीचा वाद, कांचनची तब्येत खालावली; ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट
Aai Kuthe Kay Karte Serial New Twist : 'आई कुठे काय करते' मालिका आता रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत आता नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतं आहे. ईशाच्या घटस्फोटाची बोलणी सुरु आहेत. तर कांचनची तब्येत अचानकपणे खालावली आहे. मालिकेत नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...
स्टार प्रवाहवरची ‘आई कुठे काय करते’ ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पाहिली जाते. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांना आपल्या घरातील वाटतात. देशमुख कुटुंबात सातत्याने काही नवीन गोष्टी घडत असतात. आताही या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. ईशाच्या घटस्फोट आणि त्याभोवतीच्या गोष्टी सध्या या मालिकेत दाखवण्यात येत आहेत. तर ‘समृद्धी’ बंगल्याच्या संपत्तीचा वाद सध्या मालिकेत पाहायला मिळतोय. या सगळ्यामुळे कांचनला धक्का बसला आहे. त्यामुळे तिची तब्येत खालावली आहे. अशा सगळ्या घटना या मालिकेत पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मालिका आता रंजक वळणावर आल्याचं पाहायला मिळत आहे.
ईशाचा घटस्फोट
अरुंधती आणि अनिरुद्ध यांची लेक ईशा आणि अनिश या यांनी काही दिवसांपूर्वी लग्न केलं. त्यानंतर काही दिवस या दोघांचा संसार व्यवस्थित चालला. मात्र नंतर ईशा आणि अनिशमध्ये खटके उडू लागले. आता तर या दोघांमधला वाद टोला पोहोचला आहे. त्यामुळे अनिशने ईशाला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. या नोटीसला ईशानेही उत्तर दिलं आहे. ती देखील या घटस्फोटासाठी तयार आहे.
संपत्तीचा वाद
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘समृद्धी’ या घरावरून सध्या वाद सुरु आहे. संजना आणि अनिरूद्ध यांना या बंगल्याच्या ठिकाणी टॉवर बांधायचा आहे. त्यामुळे हे घर अनिरुद्धच्या नावावर केलं जावं, अशी हे दोघे अप्पांकडे मागणी करतात. याला अभिषेकचा सपोर्ट आहे. मात्र अरुंधती आणि इतरांचा मात्र बंगला पाडून टॉवर बांधण्याला विरोध आहे. यावरून देशमुख कुटुंबात वाद सुरु आहे.
View this post on Instagram
कांचनची तब्येत खालावली
घरातील संपत्तीचा वाद आणि त्यावरून सुरु असलेल्या भांडणांमुळे कांचनला मोठा धक्का बसतो. या सगळ्यामुळे तिची तब्येत खालावली आहे. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. या सगळ्या भांडणांचा कांचनच्या तब्येतीवर परिणाम झाला आहे. आता या सगळ्यानंतर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका नव्या वळणावर आली आहे. आता या मालिकेत पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
View this post on Instagram